पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका, पुन्हा सीएनजीच्या दरात वाढ; जाणून घ्या नवे दर

पुण्यासह पिंपरी चिंडवडमध्ये सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ बुधवारी मध्यरात्रीपासून लागू झाली असून, पुण्यात आला एक किलो सीएनजीचे भाव 82 रुपयांवर पोहोचले आहेत.

पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका, पुन्हा सीएनजीच्या दरात वाढ; जाणून घ्या नवे दर
सीएनजीच्या दरात वाढ
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 8:15 AM

पुणे : देशासह राज्यात महागाईचा (Inflation) भडका उडला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये पुणेकरांना महगाईचा आणखी एक धक्का बसला आहे. पुण्यासह पिंपरी चिंडवडमध्ये सीएनजीच्या दरात (CNG rate) दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ बुधवारी मध्यरात्रीपासून लागू झाली असून, पुण्यात (Pune) आता एक किलो सीएनजीचे भाव 82 रुपयांवर पोहोचले आहेत. सध्या पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांना पसंती मिळत आहे. सीएनजी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सीएनजीची मागणी देखील वाढली आहे. सीएनजीच्या मागणीत झालेली वाढ आणि स्थानिक पातळीवर असेलेली सीएनजीची कमतरता यामुळे सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात प्रति किलो मागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

भाव वाढ सुरूच

सीएनजीच्या दरात भाव वाढ सुरूच आहे. एक एप्रिलपासून ते आतापर्यंत सीएनजीच्या दरात तब्बल चारवेळा भाववाढ करण्यात आली आहे. 28 एप्रिल 2022 ला सीएनजीचे दर प्रति किलो 77.20 रुपये एवढे होते. त्यानंतर 20 मेला सीएनजीच्या दरात पुन्हा दोन रुपयांची भाववाढ करण्यात आली. आता पुन्हा एकदा बुधवारी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीचे दर प्रति किलो 82 रुपयांवर पोहोचले आहेत. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने रिक्षा चालकांनी भाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. सीएनजीचे दर सातत्याने वाढत असून, त्याचा मोठा फटका हा व्यवसायिक वाहनांना बसत असल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

पेट्रोल, डिझेल स्थिर

एकीकडे इतर इंधनात सीएनजी, पीएनजी, एलपीजीमध्ये मोठी वाढ पहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पंधरा दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात करण्यात आली होती. अबकारी कर कमी झाल्याने पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपये प्रति लिटर स्वस्त झाले. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी तेजी दिसत असताना देखील देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.