Layoffs : Google मध्ये पुन्हा कपात, शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
Layoffs : जानेवारी महिन्यात गुगलने 6 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. गुगलमधील कर्मचाऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. त्यांना कंपनीने नोकरीवरुन कमी केले आहे.
नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलने (Google) पुन्हा एकदा नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्यात गुगलने 6 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने (Alphabet) कर्मचारी कपातीचा एजेंडा निवडला आहे. यावर्षी जानेवारी महिन्यानंतर गुगलने नोकर कपातीला ब्रेक दिला होता. अल्फाबेटने काही दिवसांपासून भरती प्रक्रिया रोडावली होती. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. पण ही कपात व्यापक स्वरुपातील नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीत भरती प्रक्रिया राबविणारा विभाग आहे. या विभागातच गुगलने कपातीचा (Google Layoffs) निर्णय घेतला. तर या विभागातील काही पदे कायम ठेवण्यात येणार आहे. या कपात सत्रामुळे गुगल गेल्या तीन महिन्यात अशी करणारी जगातील पहिली टेक कंपनी ठरली आहे. यापूर्वी फेसबुक, मायक्रोसॉफ्ट आणि एमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांनी 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली होती.
12 हजार जणांना बाहेरचा रस्ता
अल्फाबेटने यापूर्वी जानेवारी महिन्यात हजारो कर्मचाऱ्यांना बाहरेचा रस्ता दाखवला होता. आकड्यानुसार, कंपनीने 12,000 कर्मचाऱ्यांना कमी केले होते. त्यामुळे कंपनीचे एकूण मनुष्यबळ 6 टक्के कमी झाले. कंपनीकडे 30 जून रोजीपर्यंत 1,81,798 कर्मचारी होते. कर्मचारी फर्म चॅलेंजर, ग्रे अँड ख्रिसमसच्या एका अहवालानुसार, अमेरिकेत नोकर कपातीचे सत्र सुरु आहे. जुलै ते ऑगस्ट महिन्यात अनेक पटीत कर्मचारी कपात झाली होती. तर गेल्यावर्षी यामध्ये सर्वाधिक वाढ म्हणजे चार पट नोकर कपात झाली होती. अर्थतज्ज्ञानुसार, 8 सप्टेंबरपर्यंत संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीत जवळपास 9 टक्के वाढ झाली आहे. गेल्या सात दिवसात हा आकडा 13,000 कमी होऊन 2,16,000 वर पोहचला.
पिचईवर टीकास्त्र
नोकर कपातीनंतर सध्याच्या आणि माजी कर्मचाऱ्यांनी गुगलवर तोंडसूख घेतले. त्यांनी सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना रात्रीतूनच कंपनीच्या बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. जानेवारी महिन्यानंतर आता मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली आहे. पण यामुळे कर्मचारी नाराज झाले आहेत. त्यांच्या मते, भरती प्रक्रिया राबवितानाच अति प्रमाणात भरती करणे योग्य नाही. कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरुन कमी करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
गुगलचा AI वर वाढला भरवसा
प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी गुगलने AI चा रस्ता धरला आहे. अनेक उत्पादने कंपनीने अद्ययावत केली आहे. कंपनीने एक चॅटबॉट बोर्ड समोर आणला आहे. नवीन प्रकारचे एआय विकसीत करणे आणि ते सुरु ठेवणे सर्वात अवघड आहे. तर गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा, नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.