HDFC Home Loan | 10 दिवसांत पुन्हा ग्राहकांना झटका, एचडीएफसीकडून दुसऱ्यांदा व्याजदारात वाढ, गृहकर्जावरील ईएमआयचा हप्ता वाढला

HDFC Home Loan | खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक हाउसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) चे गृहकर्ज पुन्हा एकदा महाग झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना झटका बसला आहे.

HDFC Home Loan | 10 दिवसांत पुन्हा ग्राहकांना झटका, एचडीएफसीकडून दुसऱ्यांदा व्याजदारात वाढ, गृहकर्जावरील ईएमआयचा हप्ता वाढला
कर्ज पुन्हा महागलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 3:17 PM

HDFC Home Loan | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)रेपो दरात वाढ केल्यानंतर आता विविध बँकांनी कर्जावरील व्याजात वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिश्यावरचा ईएमआयचा बोजा वाढला आहे. आता बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय (EMI) भरावा लागणार आहे. खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक हाउसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) चे गृहकर्ज पुन्हा एकदा महाग झाले आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर एचडीएफसीने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 3 महिन्यांत HDFC ने 6 वेळा व्याजदर वाढवले ​​आहेत आणि नुकतेच HDFC ने रेपो रेट वाढवण्यापूर्वी व्याजदर वाढवले ​​होते. त्यानंतर आता पुन्हा एचडीएफसीने व्याजदर वाढीचा निर्णय घेतल्याने ग्राहकांच्या खिश्यावर अतिरिक्त बोजा पडला आहे. ईएमआयमध्ये वाढ झाल्याने ग्राहक हवालदिल झाला आहे.

0.25% ने वाढ

शेअर बाजाराला HDFC ने व्याजदर वाढीविषयी माहिती दिली. त्यानुसार, HDFC ने गृहकर्जाचा रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. हे नवे दर 9 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एचडीएफसीकडून निवेदनात म्हटले आहे.

1 ऑगस्ट रोजी केली होती वाढ

एचडीएफसीने 1 ऑगस्ट रोजी व्याजदरातही वाढ केली होती. HDFC ने मे पासून गृहकर्जाच्या व्याजदरात 6 वेळा वाढ केली आहे. मे महिन्यापासून व्याजदरात 1.40 टक्के वाढ केली आहे. RBIने मे महिन्यापासून रेपो रेटमध्ये 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे.

हे सुद्धा वाचा

MCLR वाढवला

एचडीएफसीने एक दिवस आधी कर्ज दराच्या किरकोळ खर्चातही वाढ केली होती. 8 ऑगस्ट रोजी, बँकेने माहिती दिली की MCLR दर सर्व कालावधीसाठी 5-10 बेसिस पॉइंट्सने वाढवण्यात येत आहेत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय बँकेने उपाय योजना करत असली तरी व्याजदर वाढल्याने ग्राहकांवर महागाईचा नाहक बोजा पडत आहे.

HDFC नवीनतम व्याज दर

एचडीएफसीच्या संकेतस्थळानुसार, गृहकर्जाचा प्रारंभिक दर पूर्वी 7.70 टक्के होता, जो आता 7.95 टक्के झाला आहे. म्हणजेच आता एचडीएफसीकडून घेतलेले गृहकर्ज पूर्वीपेक्षा महाग होणार असून ग्राहकांना ईएमआयसाठी जादा रक्कम मोजावी लागणार आहे.

रेपो दरात वाढ

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मौद्रिक नीती समितीच्या आपत्कालीन बैठकीत 5 ऑगस्ट रोजी रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो रेट 4.90 टक्क्यांहून 5.40 टक्के झाला.केंद्रीय बँकेने रेपो दरात (Repo Rate) चार महिन्यांत 1.40 टक्क्यांची वाढ केली आहे. रेपो दरात 0.50 टक्क्यांच्या वाढीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे महागाई (Inflation) भडकण्याची शक्यता आहे. आता नागरिकांचे गृहकर्ज(Home Loan) , वाहन कर्ज (Vehicle Loan) , वैयक्तिक कर्जावरील (Personal Loan) ईएमआय (EMI) वाढणार आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.