गुंतवणूकदारांसाठी नामी संधी, शेअर बाजारात ‘या’ कंपनीचा IPO खुला होणार

'अँटनी वेस्ट हँडलिंग सेल' कंपनीचा IPO येत्या सोमवारी म्हणजेच 21 डिसेंबरला खुला होईल

गुंतवणूकदारांसाठी नामी संधी, शेअर बाजारात 'या' कंपनीचा IPO खुला होणार
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 3:28 PM

मुंबई : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सोमवारी आणखी एक आयपीओ बाजारात येत आहे. ‘अँटनी वेस्ट हँडलिंग सेल’ (Antony Waste Handling Cell) या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) सोमवार म्हणजेच 21 डिसेंबरला खुला होईल. या आयपीओचा प्राईज बँड 313 ते 315 रुपये प्रति इक्विटी शेअर इतका निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओची लॉट साईज 47 शेअर्सची असून तो 23 डिसेंबरला बंद होईल. या आयपीओमध्ये 85 कोटींचा फ्रेश इश्यू असेल आणि ऑफर फॉर सेलच्या (OFS) माध्यमातून 68.24 लाख इक्विटी शेअर जारी होतील. (Antony Waste Handling Cell To Launch Its IPO On December 21st)

Antony Waste Handling Cell च्या IPO विषयी समजून घ्या

ग्रे मार्केटमध्ये ‘अँटनी वेस्ट हँडलिंग सेल’चा शेअर हा इश्यू प्राईजपेक्षा 12.4 टक्क्यांनी अधिक म्हणजेच 39 रुपयांच्या वाढीसह 354 रुपये प्रति शेअरवर ट्रेड होत आहे. ही कंपनी देशातील टॉप 5 म्युनिसिपल वेस्ट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक आहे.

या आयपीओची लॉट साईज 47 शेअर्सची असून प्राईज बँड 313 ते 315 रुपये प्रति इक्विटी शेअर इतका आहे. या हिशोबाने तुम्हाला कमीत कमी 14 हजार 805 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. कंपनी या आयपीओमध्ये गुंतवलेल्या पैशांचा वापर PCMC WTE Projects मध्ये करेल. तर काही रक्कम कंपनी कर्ज घटवण्यासाठी करेल. (Antony Waste Handling Cell To Launch Its IPO On December 21st)

शेअर होल्डर कोण कोण?

ऑफर फॉर सेल अंतर्गत सध्याचे प्रमोटर्स आणि शेअर होल्डर 68,24,933 इक्विटी शेअर ऑफर करतील. यात मॉरिशसची कंपनी लीड्स (Leeds) 13,90,330 इक्विटी शेअर्स, टोनब्रिज (Tonbridge) 20,85,510 इक्विटी शेअर्स, केम्ब्रिज (Cambridge) 11,58,667 इक्विटी शेअर्स आणि गिल्डफोर्ड (Guildford) 21,90,426 शेअर्सचा समावेश आहे.

Equirus Capital आणि IIFL Securities या इश्यूचे मॅनेजर आहेत. ‘अँटनी वेस्ट हँडलिंग सेल’चे शेअर्स बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहेत.

*विशेष सूचना : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला अवश्य घ्या*

संबंधित बातम्या :

शेअर बाजारात पैसे कमवायचेत? ‘या’ कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी

Fact check | ‘पीएम निवृत्ती वेतन योजने’तून खरंच 70 हजार रुपये मिळणार?

(Antony Waste Handling Cell To Launch Its IPO On December 21st)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.