Apple ची भारतात जोरदार कमाई; महसूल मिळवला दोन आकडी

टेक जमान्यातील दिग्गज ब्रँड Apple चे CEO Tim Cook सध्या भारतातील व्यवसायवर जाम खुश आहेत. कंपनीने भारतात विक्रीच्या बाबतीत समाधानकारक नाही तर जबरदस्त आकडा गाठला आहे. त्यामुळे जगातील अनेक मोठ्या ब्रँडचा भारताकडे पाहण्याचा चष्मा बदलणार हे सांगायला ज्योतिषी कशाला हवाय?

Apple ची भारतात जोरदार कमाई; महसूल मिळवला दोन आकडी
Apple ची जोरदार घौडदौड
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 10:12 AM

ॲप्पलची भारतातील घौडदौड सुरुच आहे. महसूलात Apple ने मोठी झेप घेतली आहे. भारतात कंपनीचे उत्पादनं हातोहात विक्री होत असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. Apple चे CEO Tim Cook या घडामोडींमुळे आनंदीत झाले आहे. मी खूप खूप आनंदी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. कंपनीने भारतात महसूल वृद्धीत दुहेरी आकडा गाठला आहे. ॲप्पलची ही घौडदौड जगातील अनेक ब्रँड्ची भारताकडे पाहण्याचा नजर बदलवणारी आहे. आगामी काळात त्याचा देशाला मोठा फायदा होऊ शकतो.

कूक तर जाम खुश

  • कंपनीचे सीईओ टीम कूक, भारतातील टीमवर आणि महसूलावर जाम खुश झाले आहेत. विक्रीचा आकडा वाढल्याने महसूलात वाढ झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. तर पाणी वाचवा अभियनासाठी, शाश्वत विकासासाठी कंपनी घेत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
  • “भारतातील ही घौडदौड आशादायक आहे. यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. आम्ही भारतात मजबुतीने डबल आकडी महसूल गाठल. मार्च महिन्यातील तिमाही निकालातील हे महसूलाचे आकडे आहेत. तुम्हाला आठवत असेल, मी यापूर्वी पण म्हटले आहे की, भारत ही एक जबरदस्त बाजारपेठ आहे. आता आम्ही या बाजारवर लक्ष्य केंद्रीत करणार आहोत.” असे टीम कूक म्हणाले.

भारतात अपार संधी

हे सुद्धा वाचा

टीम कूक गेल्या वर्षी भारतात आले होते. त्यांनी मुंबईसह दिल्लीत ॲप्पल स्टोअरचे सुरु केली होती. त्यावेळी त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली होती. भारतात अपार संधी आहेत. आम्ही व्यवसाय वाढविणाऱ्यावर आणि विक्रीवर भर देत असल्याचे कूक यांनी सांगितले. व्यवसाय वृद्धीवर काम करत असल्याचे ते म्हणाले. भारतात एक इकोसिस्टिम तयार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे कूक म्हणाले. त्यामुळे ॲप्पल देशात लवकरच इतरत्र पण स्टोअर उघडण्याची शक्यता आहे.

भारत पावला

चीन सोडून भारतात उत्पादन सुरु करणाऱ्या Apple ला सुरुवातीला व्यवसायाची शंका होती. पण कंपनीची ही शंका पहिल्याच महिन्यात हवा झाली. कंपनीला भारतात जोरदार प्रतिसाद मिळाला. त्या जोरावर कंपनीने 14 दशलक्ष डॉलर उत्पादनाचा रेकॉर्ड गेल्यावर्षी नावावर केला होता. कंपनीची भारतातील घौडदौड सुरुच आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.