सुंदर पिचाई वा सत्य नडेला नाही ही भारतीय महिला सर्वात श्रीमंत प्रोफेशनल मॅनेजर

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 ने सर्वात श्रीमंत भारतीय प्रोफेशन मॅनेजरची लीस्ट तयार केली आहे. यात ज्यांनी व्यवसाय सुरु केला किंवा व्यवसाय वाढविला अशा प्रोफेशनलचा समावेश केला आहे.

सुंदर पिचाई वा सत्य नडेला नाही ही भारतीय महिला सर्वात श्रीमंत प्रोफेशनल मॅनेजर
JAYSHREE ULLALImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 12:39 PM

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : भारतातील सर्वात श्रीमंत प्रोफेशनल मॅनजरचा विचार करता सर्वात आधी आपल्या मनात सुंदर पिचाई किंवा सत्य नडेला यांचे नाव समोर येते. परंतू हे भारतातील सर्वात श्रीमंत प्रोफेशनल मॅनेजर नाहीत, परंतू एक भारतीय महिला सर्वात श्रीमंत प्रोफेशनल मॅनेजर म्हणून हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 मध्ये निवडली गेली आहे. त्यांचे नाव जयश्री उल्लाल असे आहे. त्यांना भारतातील सर्वात श्रीमंत प्रोफेशनल मॅनेजर म्हटले जाते. अरिस्टा नेटवर्क्सच्या ( Arista Networks ) सीईओ जयश्री उल्लाल यांची एकूण संपत्ती 20,800 कोटी रुपये इतकी आहे.

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 ने सर्वात श्रीमंत भारतीय प्रोफेशन मॅनेजरची लीस्ट तयार केली आहे. यात ज्यांनी व्यवसाय सुरु केला किंवा व्यवसाय वाढविला अशा प्रोफेशनलचा समावेश केला आहे. या यादीत जयश्री उल्लाल यांना सर्वात श्रीमंत भारतीय प्रोफेशनल मॅनेजर म्हटले जाते. अरिस्टा नेटवर्क्सच्या सीईओ असलेल्या जयश्री उल्लाल यांची संपत्ती 20,800 कोटी आहे. उल्लाल यांचा जन्म लंडनमध्ये झाला असला तर त्या दिल्लीत लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांची 2008 मध्ये क्लाऊड नेटवर्कींग कंपनी अरिस्टा नेटवर्क्सच्या सीईओ म्हणून निवड झाली.

सर्वात श्रीमंत भारतीय प्रोफेशनल मॅनेजरच्या यादीत दुसऱ्या स्थानावर ओरेकलचे थॉमस कुरियन आहेत. त्यांची एकूण संपत्ती 15,800 कोटी रुपये आहे. केरळमध्ये जन्मलेले थॉमस कुरियन यांची सुरुवात मॅकिन्से एंड कंपनीत झाली होती. ते 1996 मध्ये Oracle मध्ये जॉइंट झाले आणि कंपनीचे अध्यक्ष बनले. 2019 पासून कुरीयन गुगल क्लाऊडचे सीईओ म्हणून काम करीत आहेत. तिसऱ्या नंबरवर विश्व बॅंकेचे अध्यक्ष अजयपाल सिंह बंगा आहेत. त्यांची एकूण संपत्ती 7.600 कोटी आहे. नेस्लेमधून त्यांनी करियर सुरु केले. दिल्लीच्या सेंट स्टीफंस कॉलेज आणि आयआयएम अहमदाबाद येथे त्यांचे शिक्षण झाले. बंगा यांनी मास्टरकार्डचे सीईओ आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही काम पाहीले.

4 थ्या क्रमांकावर सत्य नडेला

चौथ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला आहे. नडेला यांचे शिक्षण हैदराबादच्या पब्लिक स्कूलमध्ये झाले. त्यांची संपत्ती 7,500 कोटी आहे. ऑल्टो नेटवर्क्सचे निकेश अरोरा 7,400 कोटीच्या संपत्तीमुळे या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई ( संपत्ती 5,400 कोटी ) या यादी सहाव्या क्रमांकावर आहेत. आयआयटी खडगपूरचे विद्यार्थी असलेल्या पिचाई यांनी साल 2004 मध्ये गुगल जॉईंट केले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.