सव्वा पाच लाख रुपयांच्या कारवर तब्बल अडीच लाख रुपये टॅक्स
प्रत्येक जणाला कार खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र, त्या कारवर किती टॅक्स आहे याची कोणालाच माहिती नसते.
मुंबई : प्रत्येक मध्यमवर्गीयाचं कार खरेदी करण्याचं स्वप्न असतं. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोठा टॅक्स द्यावा लागतो. भारतात एका कारवर एवढा टॅक्स लावलेला आहे की त्या टॅक्सच्या पैशात आणखी एक कार खरेदी करता येते. एका फॉर्च्युनर कारवर सरकार एवढा टॅक्स लावती की त्या टॅक्सच्या पैशात एक एट्रिगा कार, दोन ते तीन बाईक सहजपणे खरेदी करता येतील.
प्रत्येक वाहनांवर किती टॅक्स लागतो ?
तुम्हाला कल्पना आलीच असेल की कारवरील टॅक्सच्या रुपात काय काय खरेदी करता येते. प्रत्येक जणाला कार खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र, त्या कारवर किती टॅक्स आहे याची कोणालाच माहिती नसते. कारवरील असलेल्या टॅक्सबाबत फक्त सामान्य नागरिकच आक्षेप घेत नाही तर कार कंपन्यांसाठी टॅक्स ही एक डोकेदुखी बनलीय.
भारतात कारच्या मार्केटमध्ये मारूतीचा बोलबाला आहे. देशात सर्वाधिक कार मारूती कंपनीची विकली जातात. मारूती सुझिकीचे चेअरमन आर.सी. भार्गव यांनी कारवरीस टॅक्स कमी करण्याची मागणी केलीय. सर्वच प्रकारच्या कारवर एकाच प्रकाचं टॅक्स ऑटो इंडस्ट्रीच्या वाढीसाठी हानीकारक असल्याचं भार्गव यांचं म्हणणं आहे.
50 टक्क्यांपेक्षा अधिक टॅक्सचं ओझं ऑटो इंडस्ट्री सहन करू शकणार नाही. हे समजून सांगण्यासाठी त्यांनी जापान आणि युरोपचं उदाहरण भार्गव यांनी दिलंय.भारताच्या तुलनेत युरोप आणि जापानमध्ये दरडोई उत्पन्न जास्त आहे तरीही त्या देशात भारतापेक्षा कारवर टॅक्स कमी आहे.
कारवरील टॅक्समुळे एवढे वादळ उठलंय, तो टॅक्स प्रत्येक वाहनांवर किती लागतो ते आता पाहूयात. सर्वच प्रकारच्या प्रवासी वाहनांवर मग ते वाहन कार असो की बाईक 28 टक्के जीएसटी द्यावा लागतो. त्याशिवाय एक ते 22 टक्के सेस. सेस हा वाहनातील इंजिनची क्षमता,वाहनाची लांबी यावर कसा आकारला जातो ते पाहूयात मोठी कार मोठा टॅक्स चार मीटरपेक्षा लहान आणि इंजिनची क्षमता 1200 cc पेक्षा कमी असलेल्या पेट्रोल,LPG आणि CNG कारवर त्यांच्या मूळ किंमतीच्या 28 टक्के जीएसटी आणि सेस एक टक्के असा 29 टक्के जीएसटी द्यावा लागतो.
दुसरी कॅटेगरी आहे डिझेल कारची. चार मीटरपेक्षा लहान आणि 1500 सीसीपेक्षा कमी क्षमता असलेल्या इंजिनच्या डिझेल कारवर 28 टक्के जीएसटी आणि 3 टक्के सेस असा 31 टक्के टॅक्स असतो
तिसरा प्रकारात ज्या कारची इंजिन क्षमता 1200cc हून अधिक मात्र 1500 सीसी पेक्षा कमी अशा कारवर 28 टक्के जीएसटी आणि 17 टक्के सेस म्हणजे एकूण 45 टक्के एवढ्या टॅक्सची आकारणी करण्यात येते.
ज्या वाहनांची इंजिन क्षमता 1500cc पेक्षा जास्त आहे त्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी आणि 20 टक्के सेस म्हणजेच एकूण 48 टक्के टॅक्स भरावा लागतो. तर दुसरीकडे ज्या वाहनाची इंजिन क्षमता 1500cc पेक्षा जास्त, लांबी चार मीटरपेक्षा जास्त आणि ग्राउंड क्लिअरेंस 170 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक असल्यास म्हणजेच अशा वाहनांना SUV असे म्हणतात. अशा SUV वर 22 टक्के सेस लागू होतो आणि जीएसटी एकत्र केल्यास 50 टक्के टॅक्स द्यावा लागतो.
कसे आहे कारवरील टॅक्सचे गणित ? टोयाटोची सर्वाधिक विकणारी SUV, Fortuner आहे. दिल्लीत Fortuner ची एक्स शोरूम किंमत ही 39 लाख रुपयांच्या जवळपास आहे. कंपनीकडून Fortuner कार एखाद्या राज्यात विक्रीसाठी पाठवताना Fortunerची किंमत ही जवळपास 26 लाख रुपयांएवढी असते. मात्र, 28 टक्के जीएसटी आणि 22 टक्के सेसनंतर Fortuner ची एक्स शोरूम किंमत 39 लाख रुपयांच्या जवळपास पोहचते.
या टॅक्सशिवाय RTO,इन्शुरन्स, ग्रीन सेस, TCS,इन्शुरन्सवर टॅक्ससह Fortuner ची On Road किंमत 47 लाख रुपयांपर्यंत जाते. याचाच अर्थ वाहनाच्या किंमतीत पन्नास टक्क्यांहून अधिक हा टॅक्स असतो. टॅक्समधील सर्व उत्पन्न हे सरकार आणि त्यांचा इतर विभागाकडे महसूलाच्या रुपात जमा होतो.
मोठ्या SUV ऐवजी तुम्हाला लहान कार का खरेदी लागते? याचे उत्तर तुम्हाला मिळालेच असेल. सरकारनं वाहनांवरील टॅक्स कमी केल्यास वाहनं स्वस्त होतील आणि तुमच्या खर्चात बचत होईल.या पैशाचा वापर तुम्ही एखादी मोठी SUV खरेदी करण्यासाठी किंवा भविष्यातील सुरक्षिततेसाठी एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता.