Elon buy twitter : एलन मस्क ट्विटरचे मालक बनताच क्वईन लॉंच, लगेच वाढली 7 हजार टक्क्यांनी किंमत, हा घोटाळा तर नाही ना?

'एलन बाय ट्विटर' नाण्याची किंमत क्षणार्धात गगनाला भिडली. तर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या आवडत्या क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइनची किंमतही हा करार पूर्ण झाल्यानंतर गगनाला भिडली.

Elon buy twitter : एलन मस्क ट्विटरचे मालक बनताच क्वईन लॉंच, लगेच वाढली 7 हजार टक्क्यांनी किंमत, हा घोटाळा तर नाही ना?
एलॉन मस्क ट्विटरचे मालक बनताच लॉंच झाला क्वईनImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 11:43 AM

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचा (Elon Musk Buys Twitter)  ताबा घेतला आहे. सोमवारी रात्री उशिरा या करारावर (Twitter Deal) शिक्कामोर्तब करण्यात आला. या करारामुळे जागतिक बाजारपेठेत ट्विटरचे शेअर्स चढले असताना क्रिप्टो मार्केटमध्येही त्याचा मोठा परिणाम दिसून आला आहे. विशेष म्हणजे मस्कने ट्विटर विकत घेण्याची ऑफर स्वीकारल्याच्या वृत्तानंतर एका व्यक्तीने ‘एलॉन बाय ट्विटर’ नावाचे क्रिप्टो क्वईन लॉन्च केले आहे. हे एका क्षणात गगणाला भिडले. एका अहवालानुसार, ट्विटरच्या विक्रीच्या वृत्तानंतर ‘एलॉन बाय ट्विटर’ (Elon buy twitter) नाण्याची किंमत लगेचच वाढली आणि काही तासांतच त्याची किंमत 7 हजार टक्क्यांवर गेली. हे नाणे खरेदी करण्यासाठी क्रिप्टो (Cryptocurrency) गुंतवणूकदारांमध्ये स्पर्धा होती. त्यामुळे याविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, हा घोटाळा तर नाही ना, यावरही सध्या चर्चा रंगली आहे.

‘त्या’ क्रिप्टोकरन्सीची किंमत किती?

‘एलन बाय ट्विटर’ नाण्याची किंमत क्षणार्धात गगनाला भिडलेली असताना टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या आवडत्या क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइनची किंमतही हा करार पूर्ण झाल्यानंतर गगनाला भिडली. क्रिप्टो मार्केटमध्ये डॉजकॉइन 20.89 टक्क्यांच्या वाढीसह 12.62 रुपयांवर व्यवहार करत होते. गेल्या 24 तासांत त्याची किंमत 2.18 रुपयांनी वाढली आहे. मात्र, किंमतीत आता बदल झाला आहे. विशेष म्हणजे, ट्विटरच्या विक्रीच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, क्रिप्टो बाजारातील टॉप-10 क्रिप्टोकरन्सीच्या किंमती वाढल्या. तर इतर डिजिटल चलने देखील हिरव्या चिन्हावर व्यवहार करताना दिसल्या. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन बद्दल बोलायचे तर ते 2.77 टक्के किंवा 87 हजार 841 रुपयांनी वाढून 32 लाख 54 हजार 789 रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, इथरियम ही दुसरी सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी 3.81 टक्के किंवा 8 हजार 837 रुपये वाढली आणि त्याची किंमत 2 लाख 41 हजार 018 रुपये झाली आहे.

फक्त ३ अब्ज डॉलरची रोकड शिल्लक

ट्विटरची इक्विटी खरेदी करण्यासाठी 21 अब्ज डॉलर रोख देणार असल्याचे मस्क यांनी सांगितले. पण आता उरलेले पैसे तो कुठे घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार त्यांची एकूण संपत्ती 257 अब्ज डॉलर इतकी आहे यात शंका नाही. पण ब्लूमबर्गचा अंदाज आहे की मस्ककडे केवळ 3 अब्ज डॉलर्सची रोकड आणि काही विक्री योग्य मालमत्ता आहेत. दरम्यान, ‘एलॉन बाय ट्विटर’ नावाचे क्रिप्टो कॉईन लॉन्च केले आहे. हे एका क्षणात गगणाला भिडले असले तरी याकडे घोटाळ्याच्या नजरेतूनही तज्ज्ञ पाहतायेत.

इतर बातम्या

Online Payment : QR कोडने व्यवहार करत असाल तर सावधान, काही ‘चुकां’ मुळे तुमचे खाते होऊ शकते रिकामे !

LIC IPO Breaking : LIC चा IPO 4 मे रोजी येणार, तुम्ही कधी पर्यंत खरेदी करु शकता? जाणून घ्या सगळंकाही…

Petrol Diesel Price Today : सलग 21व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर! कच्च तेल स्वस्त, पेट्रोलही स्वस्त होणार?

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.