किशोर पाटील, जळगाव | 14 डिसेंबर 2023 : जळगावची सुवर्णपेठ ग्राहकांनी गजबजली. या आठवड्यात सलग चौथ्या दिवशी पण सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. सुवर्णनगरीमध्ये आठवडाभरापासून सोने चांदीच्या दरात चढउतार सुरु होता. आठवडाभराते सोन्याचे दर १३०० रुपयांनी घसरले. ६३ हजार ८०० रुपयांवर असलेले सोन्याचे दर ६२ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी झाले. जागतिक बाजारपेठेत गुंतवणूक वाढल्याचा हा परिणाम असल्याचे समोर येत आहे. सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांची चांदी झाली आहे.
कमी झाला भाव
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर आठवडाभरा पूर्वी ६३ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचले होते. त्यात आठवडाभरात तेराशे रुपयांनी घसरण झाले असून हे ६२ हजार पाचशे रुपयांपर्यंत येवून पोहचले आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. लग्नसराईत सोन्याचे दर घसरल्याने सुवर्णनगरीत ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. सुवर्णनगरी गजबजली आहे. काही दिवसांपूर्वी जळगावच्या सुवर्ण बाजाराकडे ग्राहकांनी दरवाढीमुळे पाठ फिरवली होती. दिवाळीपासून दोन्ही धातूच्या किंमती सूसाट होत्या. सोन्याने 65 हजारांच्या टप्पा ओलांडला तर चांदी 78 हजारांच्या घरात पोहचली होती. लग्नसराईत भाव एकदम वाढल्याने चिंता वाढली होती. भाव कमी झाल्याने ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,201 रुपये, 23 कॅरेट 60,956 रुपये, 22 कॅरेट सोने 56,060 रुपये झाले. 18 कॅरेट 45,901 रुपये, 14 कॅरेट सोने 35,803 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,898 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.