अभिषेक बच्चन आणि शाहिद कपूरच्या शेजारी घेतलं घरं, कोण आहे हा इसम ? 115 कोटींना..
ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट हा एक लक्झरी निवासी प्रकल्प आहे. तेथे 4 BHK आणि 5 BHK युनिट्स, डुप्लेक्स अपार्टमेंट आणि पेंटहाऊससह असलेले 2 टॉवर आहेत. मुंबईतील वरळी येथे असलेल्या या प्रकल्पात ॲशले नागपाल आणि त्यांची पत्नी बियान्का नागपाल यांनी 115 कोटी रुपयांना एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे.
फर्निचर फिटिंग आणि ॲक्सेसरीज फर्म एबको प्रायव्हेट लिमिटेडचे ((Ebco)) प्रमोचर ॲशले नागपाल आणि त्यांची पत्नी बियान्का नागपाल यांनी मुंबईच्या वरळी भागात 115 कोटी रुपयांना एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. रिपोर्टनुसार, हे अपार्टमेंट ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट प्रकल्पाच्या 60 व्या मजल्यावर आहे. इथे बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय सेलिब्रिटीही
किती एरिया आणि किंमत ?
7,139 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे अपार्टमेंट 1.60 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने विकले गेले. 28 ऑगस्ट 2024 रोजी व्यवहाराची नोंदणी करण्यात आली होती आणि त्यात 5 कार पार्किंग स्पेसचा समावेश आहे. या दांपत्याने मालमत्तेसाठी 4.55 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये रजिस्टेरशन फी म्हणून भरले.
ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट
ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट हा एक लक्झरी निवासी प्रकल्प आहे. तेथे 4 BHK आणि 5 BHK युनिट्स, डुप्लेक्स अपार्टमेंट आणि पेंटहाऊससह असलेले 2 टॉवर आहेत. या प्रकल्पाला 2022 मध्ये त्याचे व्यवसाय प्रमाणपत्र मिळाले. समुद्राच्या दृश्यांसाठी ओळखले जाते. त्याची उंची 360 मीटर आहे. यातील सर्व फ्लॅट्स पश्चिमे दिशेने आहेत.
कोण आहेत ॲशले नागपाल ?
लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ॲशले नागपाल जून 1986 पासून ऍबको प्रायव्हेट लिमिटेडमध्ये टेक्निकल डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. 1982 ते 1986 दरम्यान त्यांनी बंगलोर विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. याआधी त्यांनी 1981 मध्ये सेंट झेवियर्स कॉलेज आणि 1979 मध्ये सेंट पॉल स्कूल, दार्जिलिंग येथे शालेय शिक्षण घेतले.
दिग्गज शेजारी
ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट बॉलीवूड सेलिब्रिटी आणि अनेक दिग्गजांमध्ये लोकप्रिय आहे. बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिषेक बच्चन, डीमार्टचे राधाकृष्ण दमानी आणि एव्हरेस्ट मसाला ग्रुपचे प्रमोटर वाडीलाल भाई शाह यांचे फ्लॅटही ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्टमध्ये आहेत.याच वरषी सशाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा यांनी या इमारतीत 5,395 स्क्वेअर फूटचा एक फ्लॅट 60 कोटी रुपयांना खरेदी केला.