Digital Transaction : डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचा विश्वविक्रम! जगातील या बड्या आसामींना दाखविले आस्मान, एवढी झाली उलाढाल

Digital Transaction : डिजिटल व्यवहारांमध्ये भारताने जगातील मोठ्या महासत्तांना मागे टाकून हा विश्वविक्रम केला आहे.

Digital Transaction : डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचा विश्वविक्रम! जगातील या बड्या आसामींना दाखविले आस्मान, एवढी झाली उलाढाल
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 7:56 AM

नवी दिल्ली : डिजिटल व्यवहारांमध्ये (Digital Transaction) भारताने विश्वविक्रम केला आहे. युपीआय व्यवहारात (UPI) भारताने देशातच नाही तर परदेशातही एंट्री केली आहे. या नाविन्यपूर्ण टूलमुळे देशात व्यवहारांना मोठी चालना मिळाली. डिजिटल व्यवहारांची संख्या इतकी वाढली की, भारताने अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी आणि फ्रांस या अतिप्रगत देशांनाही मागे टाकले आहे. या विकसीत देशांपेक्षा भारतीय डिजिटल व्यवहारांचा वेग चार पट अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. भारताच्या या विक्रमाची नोंद स्वित्झर्लंडमधील दावोस या शहरातील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये (WEF) घेण्यात आली.

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या एका सत्रात केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना याविषयीचा प्रश्न केला होता. तेव्हा त्यांनी डिसेंबर 2022 मध्ये भारतात डिजिटल पेमेंट ट्रँझॅक्शनच्या माध्यमातून जवळपास 1500 अब्ज डॉलर (1, 21, 753 अब्ज रुपये ) पैशांची देवाण-घेवाण करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

इतर देशांच्या डिजिटल व्यवहारांशी त्याची तुलना करण्यात आली. आकडेवारी आधारे तफावत लक्षात आली. अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी आणि फ्रांस या देशांची एकूण मिळून जेवढे डिजिटल पेमेंट करण्यात आले, त्याचा आढावा घेण्यात आला. या सर्व देशांपेक्षा भारतात चार पट अधिक डिजिटल व्यवहार झाल्याचा दावा वैष्णव यांनी केला.

अश्विनी वैष्णव यांनी वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये संपूर्ण जगात India Stack देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला India Stack स्वीकारण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय डिजिटल पेमेंट विकसीत अर्थव्यवस्थेसह विकसनशील देश आणि नवीन कंपन्यांना जीवनदान देणारेच ठरणार नाही तर गती देणारे ठरणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म ओपन सोर्स प्लॅटफॉर्म वर आधारीत असल्याने त्याचा सगळ्यांनाच फायदा होतो.

या नवीन पद्धतीच्या देवाण-घेवाणीच्या पद्धतीने भारतीयांना जगभरात व्यवहार करता येतील. त्यांना पैसे पाठविता येतील आणि रक्कम प्राप्त करता येईल. इंडिया स्टॅकची ओळख, डाटा आणि पेमेंटसंबंधीचे डिजिटल समाधान देऊ शकते.

यामध्ये UPI, Bharat QR, Aadhaar Pay, IMPS आणि eKYC यासारख्या अनेक डिजिटल अॅप्सचा समावेश आहे. यामाध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. दररोज कोट्यवधींचे व्यवहार होतात.

डिसेंबर महिन्याच्या युपीआय व्यवहारांनी विक्रम नोंदवला आहे. युपीआय व्यवहारांनी एकट्या डिसेंबर महिन्यात 12.82 लाख कोटी रुपये मूल्यांचे 782.9 कोटी डिजिटल पेमेंट ट्रान्झाक्शनचा नवीन रेकॉर्ड केला आहे.

युपीआय हे एक रिअल टाईम पेमेंट सिस्टम आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून बँक खात्यातून झटपट रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी तिचा वापर होतो. युपीआयच्या माध्यमातून तुम्ही बँक खात्याला युपीआयशी जोडू शकता. तसेच अनेक बँक खातेही युपीआय अॅपच्या माध्यमातून वापरु शकता.

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.