Gold Silver Price Today : लग्नसराईत आनंदवार्ता! भाव वाढीला ब्रेक, सोने झाले स्वस्त, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटची किंमत

Gold Silver Price Today : गेल्या तीन दिवसांपासून सराफा असोसिएशनने सोने-चांदीचे भाव जाहीर केलेले नाही. पण सराफा बाजारात, भावांमध्ये मोठी उलथापालथ झाली नाही. ऐन लग्नसराईत दोन्ही मौल्यवान धातूंनी नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.

Gold Silver Price Today : लग्नसराईत आनंदवार्ता! भाव वाढीला ब्रेक, सोने झाले स्वस्त, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटची किंमत
सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 10:22 AM

नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांपासून सराफा असोसिएशनने सोने-चांदीचे भाव (Gold Silver Price) जाहीर केलेले नाही. पण सराफा बाजारात, भावांमध्ये मोठी उलथापालथ झाली नाही. ऐन लग्नसराईत दोन्ही मौल्यवान धातूंनी नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. सध्या सोने त्याच्या सर्वकालीन विक्रमी किंमतीपेक्षा जवळपास 700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी जवळपास 6100 रुपये प्रति किलो स्वस्त मिळत आहे. सध्या दिल्ली सराफात सोने 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 74000 रुपये प्रति किलोच्या जवळपास आहे. प्रत्येक शहरात भावात तफावत दिसून येते.

आज जाहीर होईल भाव इंडियन बुलियन ज्वेलर्स असोशिएशनने (IBJA) सकाळच्या सत्रातील भाव 10:12 वाजेपर्यंत जाहीर केले नाहीत. या संघटनेच्या संकेतस्थळावर अद्याप 28 एप्रिल रोजीचाच भाव आहे. आजपासून व्यापारी सत्राची सुरुवात होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सलग सुट्या असल्याने संघटनेने भाव जाहीर केले नाही. संघटना आज भाव जाहीर करेल.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव दिल्ली सराफा बाजारानुसार, 24 कॅरेट सोने 347 रुपयांनी स्वस्त होऊन 60168 रुपये, 23 कॅरेट सोने 346 रुपयांनी स्वस्त होऊन 59927 रुपये, 22 कॅरेट सोने 288 रुपयांनी घसरुन 55114 रुपये, 18 कॅरेट सोने 260 रुपयांनी सस्त होऊन 45126 रुपये आणि 14 कॅरेट सोने 203 रुपयांनी घसरुन 35198 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचा भाव कोणत्याही कराशिवाय जाहीर होतात.

हे सुद्धा वाचा

आज काय भाव गुडरिटर्न्सनुसार, 2 मे रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम, 55,850 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 61,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झाला नाही. तर एक किलो चांदीचा 76,000 रुपये भाव आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.