Share Buyback : वर्षाच्या शेवटी गुंतवणूकदारांना लॉटरी, या कंपनीची बायबॅक ऑफर, 240 रुपयांनी खरेदी करणार प्रत्येक शेअर..

Share Buyback : या कंपनीच्या गुंतवणूकदारांना लॉटरी लागली आहे..

Share Buyback : वर्षाच्या शेवटी गुंतवणूकदारांना लॉटरी, या कंपनीची बायबॅक ऑफर, 240 रुपयांनी खरेदी करणार प्रत्येक शेअर..
जोरदार ऑफरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 7:50 PM

नवी दिल्ली : बजाज समूहाची कंपनी बजाज कंझ्युमर केअरने (Bajaj Consumer Care) गुंतवणूकदारांसाठी मोठी ऑफर आणली आहे. परिणामी वर्षाच्या शेवटी त्यांना लॉटरी लागली आहे. शुक्रवारी या कंपनीने प्रत्येक शेअरसाठी 240 रुपये बायबॅक ऑफर (Buyback Offer) जाहीर केली आहे. ही कंपनी एकूण 80.89 कोटी रुपयांचे शेअर बायबॅक करेल. FMCG कंपनी बजाज कंझ्युमर केअर मार्केट रूटमधून बायबॅक करेल. 33.7 लाखांपर्यंत शेअर बायबॅक करेल. शुक्रवारी कंपनीच्या मुंबई येथील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बोर्ड मीटिंगमध्ये याविषयीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

बजाज कंझ्युमर केअरचा शेअर शुक्रवारी BSE वर 3 टक्क्यांनी वधरला आणि 184.25 रुपयांवर पोहचला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा शेअर 179.65 रुपयांवर बंद झाला. या शेअरने गेल्या सहा महिन्यांत 30 टक्क्यांची उसळी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या खूश आहेत.

कंपनीचा शेअर 10 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 138.55 रुपये होता. FMCG कंपनी बजाज कंझ्युमर केअरचा शेअर 9 डिसेंबर 2022 रोजी बीएसईवर 179.65 वर बंद झाला. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 18 टक्क्यांची वाढ झाली.

हे सुद्धा वाचा

तर यंदा कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची घसरण दिसून आली. कंपनीचे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 207.45 रुपयांवर होता. तर 52 आठवड्यांच्या नीच्चांकी स्तरावर 129.25 रुपयांवर पोहचला होता. आता सध्या या शेअरची घौडदौड सुरु आहे.

कंपनीच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. अर्थात ही केवळ कंपनीच्या निर्णयाची माहिती आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला बिलकूल नाही. बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत जरुर घ्या. तुम्हीही बाजाराविषयी अपडेट रहा. मगच गुंतवणूक करा.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.