Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Auto Stock : ऑटो सेक्टरमध्ये कमाईची संधी, मिळेल 34 टक्क्यांपर्यंत बंपर रिटर्न

Auto Stock : ऑटो सेक्टरमध्ये यंदा कमाईची संधी मिळणार आहे.

Auto Stock : ऑटो सेक्टरमध्ये कमाईची संधी, मिळेल 34 टक्क्यांपर्यंत बंपर रिटर्न
कमाईची संधी
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 6:26 PM

नवी दिल्ली : ऑटो सेक्टरमध्ये यंदा गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी आहे. यावर्षी 2023 मध्ये तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऑटो सेक्टरमधील शेअर (Auto Stocks) असल्यास फायद्यात रहाल. ऑटो सेक्टरमधील वाहन विक्रीची आकडेवारी समोर आली. तेव्हापासून ऑटो सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांचा (Investors) विश्वास वाढला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) यांनी काही ऑटो शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ब्रोकरेज फर्म ओसवाल यांच्या मते, ऑटो कंपन्यांची व्हॅल्यूम ग्रोथमध्ये येत्या काही दिवसात वृद्धी दिसून येईल. रिसर्च फर्मने टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि आयशर मोटर्सवर विश्वास दाखविला आहे. या शेअरमध्ये जवळपास 34 टक्क्यांची वृद्धी दिसून येत आहे.

Tata Motors चा शेअर खरेदी करण्याचा सल्ला मोतीलाल ओसवालने दिला आहे. फर्मने प्रति शेअर टारगेट प्राईस 500 रुपये ठेवली आहे. 4 जानेवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 385.75 रुपये होता. फर्मच्या दाव्यानुसार, या शेअरमध्ये जवळपास 30 टक्के परतावा दिसून येईल.

हे सुद्धा वाचा

या आर्थिक वर्षात टाटा मोटर्सचा एकूण व्हॅल्यूम ग्रोथ 32 टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. टाटा मोटर्सचा शेअर 7.2x FY23E/4x FY24E EV/EBITDA वर व्यापार करत आहेत. 500 रुपयांच्या टारगेटसह खरेदीचा सल्ला देण्यात येत आहे.

मोतीलाल ओसवालने मारुती सुझुकी वर 11,250 रुपयांचे लक्ष्य निर्धारीत करत खरेदीचा सल्ला दिला आहे. 4 जानेवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 8,419 रुपये होती. या स्टॉकमधून जवळपास 34 टक्क्यांचा परतावा मिळण्याचा अंदजा वर्तविण्यात येत आहे.

ब्रोकरेज हाऊसच्या दाव्यानुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये या शेअरमध्ये वार्षिक 21 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. हा स्टॉक स्‍टॉक 35.5x/22.2x FY23E/FY24E व्यापार करत आहे. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत आहे.

Eicher Motors खरेदीचा सल्ला ओसवाल फर्मने दिला आहे. प्रति शेअर टारगेट प्राईस 4,150 रुपये देण्यात आली आहे. 4 जानेवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 3,216 रुपये होती. या शेअरमध्ये जवळपास 29 टक्के परतावा दिसू शकतो.

या आर्थिक वर्षात रॉयल एनफिल्डची व्हॅल्यूम ग्रोथ 44 टक्के राहण्याची शक्यता आहे. स्‍टॉक 29.7x/20.2x FY23E/FY24E वर हा शेअर ट्रेंड करत आहे. फर्मने हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना मोठा फायदा होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हा केवळ गुंतवणुकीचा सल्ला आहे. बाजारात गुंतवणूक करताना तुमचा अनुभव, अभ्यास याआधारे गुंतवणूक करावी. बाजारातील सल्लागार, तज्ज्ञ यांच्या मदतीनेच गुंतवणूक करावी.

तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.