AUTO TRACKER: ‘ह्युंदाई’ला सोशल झळ, वाहन विक्रीचा टक्का घसरला; ‘ही’ कंपनी टॉप

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात वाहन विक्रीने 3 लाखांचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक वाहन विक्रीच्या यादीत स्कोडानं आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत स्कोडाच्या वाहन विक्रीत तब्बल 387 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे.

AUTO TRACKER: ‘ह्युंदाई’ला सोशल झळ, वाहन विक्रीचा टक्का घसरला; ‘ही’ कंपनी टॉप
Hyundai च्या कार विक्रिला मोठा फटका Image Credit source: hyundai.com
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 9:07 PM

नवी दिल्लीकोविड काळात (COVID CRISIS) गती मंदावलेल्या ऑटो क्षेत्राचा (AUTO SECTOR) गाडा पुन्हा रुळावर आला आहे. मध्यमवर्गीयांच्या वाढत्या आकांक्षा, आयटी सेक्टरचं बूस्टर, इलेक्ट्रॉनिक वाहनांची चलती यामुळं ऑटो क्षेत्रात वाहन खरेदीत वाढ नोंदविली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात वाहन विक्रीने 3 लाखांचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक वाहन विक्रीच्या यादीत स्कोडानं आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत स्कोडाच्या वाहन विक्रीत तब्बल 387 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. गेल्या महिन्यात देशभरातील 5 हजारांहून अधिक ग्राहकांनी स्कोडाच्या (SKODA) खरेदीला पसंती दर्शविली. वाहन विक्रीच्या क्रमवारीत ह्युदाई कंपनीनं तळ गाठला आहे. गेल्या मार्च महिन्यात कंपनीच्या वाहन विक्रीत -15.21% ने घट नोंदविली गेली आहे.

कार विक्री टक्केवारीत :

• स्कोडा- (मार्च 2022) 5649/ (मार्च 2021) 1159 (387.40%) • फोक्सवॅगन-(मार्च 2022) 3672/(मार्च 2021) 2025 (81.33%) • महिंद्रा-(मार्च 2022) 27603/ (मार्च 2021) 16700 (65.29%) • टाटा- (मार्च 2022) 42293/ (मार्च 2021) 29654 (42.62%)

मार्च 2022 युनिट विक्री –

• सुझुकी-1,33,861 • ह्युंदाई- 44600 • टाटा- 42,293 • महिंद्रा- 27,603

कुणाच्या किती गाड्या विकल्या?

किआचा वाढता जलवा:

कोरियन कंपनी Kia ने गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये 22,622 युनिट्स विकल्या आहेत. तर फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीने 8,415 युनिट्सची विक्री केली होती. अलीकडेच कंपनीने थ्री-रो एमपीव्ही कार सादर केली आहे, जी 6-7 सीटर कार आहे.

ह्युंदाईला ‘सोशल’ झळ:

काश्मीर मुद्द्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवरून ह्युंदाई वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. Hyundai India ने आपल्या ट्विटर अकाउंटवर अधिकृत निवेदन जारी केले आहे. कंपनी गेल्या 25 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहे आणि राष्ट्रवादाच्या भावनेचा मनापासून आदर करते.

‘टाटा’ इलेक्ट्रिक फीव्हर:

टाटाच्या इलेक्ट्रिक वाहनांनी ग्राहकांवर मोहिनी घातली आहे. टाटाने अपडेटेड Tigor EV सादर केली, तर Nexon EV कार सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी प्रवासी इलेक्ट्रिक कार ठरली आहे. टाटा सध्या तीन EV प्लॅटफॉर्म तयार करत आहे, ज्यामध्ये एक डेडीकेटेड स्केटबोर्ड देखील आहे.

Mahindra Upcoming EV: महिंद्राची ईव्ही लाँचिंगसाठी सज्ज, डिझाईन लीक

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.