मोदी सरकारच्या या योजनेमधून मिळणार 5 लाखांचा फायदा, हा टोल फ्री नंबर लक्षात ठेवा!
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या यशस्वी कामगिरीचा पाढा वाचताना आयुष्यमान भारत योजनेचा आवर्जून उल्लेख केला.
नवी दिल्ली : अलीगड मुस्लिम विद्यापीठाला आज 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या या शताब्दी समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या यशस्वी कामगिरीचा पाढा वाचताना आयुष्यमान भारत योजनेचा आवर्जून उल्लेख केला. कोणत्याही भेदभावाशिवाय आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 50 कोटी लोकांवर 5 लाखापर्यंतचे मोफत इलाज केले आहेत. पाठीमागच्या सप्टेंबर महिन्यात ही योजना सुरु करण्यात आली होती. आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो का?, लाभ घेतला आहे का?, अशा प्रश्नांची सखोल उत्तरे जाणून घेण्यासाठी सरकारकडून एक टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे. (Ayushman Bharat yojna Modi Government)
तुम्हाला 14555//1800111565 हा नंबर डायल करुन आपल्या परिवाराचं या योजनेत नाव आहे का? या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण पात्र आहोत का?, अशा प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. याशिवाय आपण कॉमन मिनिमम सेंटरची देखील मदत घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत आरोग्य मित्र हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून उपचारापर्यंत संपूर्ण सहकार्य मिळू शकते. आपण https://mera.pmjay.gov.in/search/login या लिंकवर गेल्यानंतर या योजनेसाठी आपली एलिजिबीलिटी चेक करु शकतो.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 1300 आजारांवर मोफत उपचार
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोरोनाचा देखील मोफत इलाज होऊ शकतो. कोरोना व्हायरसचं संक्रमण वेगाने पसरायला लागल्यानंतर सरकारने हा निर्णय तातडीने घेतला. या योजनेत जवळपास 1300 आजारांवर मोफत औषधोपचार होऊ शकतात. यामध्ये कॅन्सर, ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, रेडियोलॉजी यांसारख्या महागड्या आजावरच्या उपचारांचा देखील समावेश आहे.
योजनेचे फायदे
- या योजनेंतर्गत, क्लिनिकल उपचार, आरोग्य उपचार आणि औषधे रुग्णालयात दाखल होण्याचा अगोदर 3 दिवस आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवस उपलब्ध असतील
- या योजनेला कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय किंवा लिंग यांचं कोणतंही बंधन नाही.
- पीएम-जेएआय पोर्टेबल योजना आहे, म्हणजेच लाभार्थी देशभरातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी सूचीमध्ये असलेल्या रुग्णालयात त्याचा लाभ घेऊ शकतात.
संबंधित बातम्या
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात ‘मिनी इंडिया’, मोदींकडून पुन्हा ‘सबका साथ’चा नारा