बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या हस्ते ‘देश की तिजोरी’ अभियानाचे अनावरण
भारतीय 'तिजोरी' या नावाने ओळखले जाणारे - गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने आज बॉलिवूड स्टार आणि ब्रँड अॅम्बेसेडर आयुष्मान खुराना यांच्यासोबत 'देश की तिजोरी' या त्यांच्या नवीनतम मोहिमेचे अनावरण केले.
मुंबई : ‘देश की तिजोरी’ म्हणून ओळखले जाणाऱ्या गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सच्या अभियानाचे बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या हस्ते आज अनावरण झाले. गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉइसचे व्यापार युनिट असलेले गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्स त्यांच्या सिक्युर (Secure 4.0) व्यासपीठाद्वारे कल्पकता आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपायांवर लक्ष केंद्रित करत आहे.
गोदरेजने 1902 सालामध्ये बनविलेल्या पहिल्या भारतीय लॉकरपासून (मेड इन इंडिया) ते आजच्या अगदी नवीनतम डिजिटल लॉकर्सपर्यंत गोदरेजच्या उत्पादनांनी भारतात घरोघरी आपले एक वेगळे स्थान कसे निर्माण केले हे ‘देश की तिजोरी’ अभियान लोकांपर्यंत पोहोचवत आहे. व्हॅनच्या आत तयार केलेले स्मार्ट होम व्हिडीओ डोअर फोनपासून ते होम सेक्युरिटी लॉकरपर्यंत, होम सेक्युरिटी कॅमेऱ्यांपासून ते सीसिटीव्ही कॅमेऱ्यांपर्यंत विविध स्मार्ट होम सुरक्षा उत्पादनांची एक सर्वसमावेशक श्रेणींचे प्रदर्शन करते.
व्हॅनच्या आत तयार केलेले हे स्मार्ट होम एका अशा अतिशय कार्यक्षम उपक्रमाचे प्रतिनिधीत्व करते ज्या उपक्रमाचा उद्देश घर मालकांना स्मार्ट होम सुरक्षा उपाय वापरण्यासाठी प्रेरणा देणे आणि त्यासंबंधी मार्गदर्शन करणे हा आहे.
गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सचे व्यवसाय प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. पुष्कर गोखले म्हणाले, “एक ब्रॅंड म्हणून ज्याने केवळ भारतातील घरेच नाही तर बँकिंग क्षेत्र, ज्वेलरी क्षेत्र किंवा अभ्यागत आणि (हॉस्पिटलिटी) अशा अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांच्या सुरक्षिततेसाठी अव्याहतपणे काम केले आहे. त्या गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्सच्या सिक्युर ४.० (Secure 4.0) च्या अंतर्गत आम्ही ज्या नवकल्पना ग्राहकांसाठी आणत असतो त्यांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहून मला अतिशय आनंद होत आहे.
कल्पकता, नावीन्य आणि सुरक्षितता यांच्या वचनबद्धतेसह गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्स व्यवसायांच्या व लोकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक उत्पादने बाजारात आणून या उद्योग क्षेत्रातील मानके नव्याने ठरवित राहील. सिक्युर ४.० (Secure 4.0) अभियान हे लोकांना बदलत्या धोक्यांबद्दल माहीत करून देणे आणि वापरकर्त्यांना नवीन व अधिक उत्तम सुरक्षा उपाय घेण्यासंबंधी जागृत करणे यासाठी गोदरेज सेक्युरिटी सोल्यूशन्स करत असलेल्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग आहे.
‘की लॉक’ आणि ‘डिजिटल लॉक’ अशा दोन भिन्न प्रकारांमध्ये येणारे हे नवीन ‘मॅट्रिक्स लॉकर’ कारागिरी आणि तंत्रज्ञान या दोन्हीच्या सर्वोत्तम बिंदूचे प्रतिनिधीत्व करते. ‘की लॉक’ प्रकार प्रथमच लक्षणीय रीतीने सुरक्षा वाढविणारी अभूतपूर्व अशी डयूएल कंट्रोल लॉक यंत्रणा आणत आहे. दुसरीकडे, ‘डिजिटल लॉक’ प्रकार मास्टर कोड, यूजर कोड आणि एक आवश्यक अशी ओव्हर राइड की यांसह सुरक्षेच्या विविध पर्यायांची एक श्रेणीच प्रदान करते. ही दोन स्तरीय सुरक्षा निश्चित करते की, केवळ अधिकृत व्यक्तीच मॅट्रिक्स लॉकरच्या अतिशय बारकाईने डिझाईन केलेल्या आतील भागात प्रवेश मिळवू शकतील. आतमध्ये तुमच्या गरजा पूर्ण करेल अशी अत्यंत विचारपूर्वक तयार केलेली रचना आहे. यामध्ये अॅडजस्ट करता येण्याजोगे कठिण अश्या काचेचे कोनाडे आणि इंटेलिजन्ट प्रकाश योजना आहे.
ज्यामुळे तुम्हाला तुमचे सामान व्यवस्थित जमवून ठेवणे आणि ते सहजतेने हवे तेव्हा मिळवणे सोपे होते. मॅट्रिक्स लॉकर तर सुरक्षेच्या बाबतीत एक पाऊल आणखी पुढे जाते. बाहेरील धोक्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी यामध्ये आर्मर प्लेट (चिलखत) सह दुहेरी भिंतीचे संरक्षण (डबल वॉल प्रोटेक्शन) समाविष्ट आहे. याशिवाय, ऑटो फ्रीज वैशिष्ठ्य प्रवेश मिळविण्यासाठी वारंवार अयशस्वी प्रयत्न केला तर वापरकर्त्याचा प्रवेश नाकारतो, ज्यामुळे कोणत्याही अनधिकृत प्रवेशाला प्रभावीपणे अडविले जाऊन अधिक सुरक्षिततेची हमी मिळते.
मॅट्रिक्स लॉकर इतरांपेक्षा वेगळे ठरते ते त्याच्या अनुकूलन क्षमतेमुळे (अॅडाप्टॅबिलिटी). हे जीएसएम मॉडयूल (GMS Module), एक्सटर्नल हूटर (External hooter), आय-वॉर्न सेन्सर (I- Warn sensor) यांच्याशी हे सुसंगत आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या विशिष्ट आवश्यकतांनुसार सानुकूल करता येईल अशी सर्वसमावेशक सुरक्षा प्रणाली तयार करता येते. ही अनोखी अनुकूलन क्षमता खऱ्या अर्थाने मॅट्रिक्स लॉकरला सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांचे एक मूर्त प्रतीक बनवते.
अधिकृत प्रवेशाची अचूकता अजून जास्त सुधारण्यासाठी फेस रेकग्निशन सिस्टम स्विंग लेन बॅरिअरमध्ये जोडले जाऊ शकते. गोदरेज स्विंग लेन बॅरिअर हे एक कल्पक आणि नवीन प्रकारचे पायी चालणाऱ्यांवर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठीचे तंत्रज्ञान (पेडेस्ट्रीअन कंट्रोल टेक्नॉलॉजी) असून ते गुणवत्ता, कामगिरी आणि किफायतशीरपणा यासर्वांमध्ये उत्तम संतुलन साधण्यासाठी खास तयार केले आहे.
गोदरेज स्विंग लेन बॅरिअर (जीएसएलबी) मालिका अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी एक विश्वासार्ह असे यांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक यांचे उत्तम संयोजन प्रदान करते. प्रतिबंध करीत असतानदेखील ते एक स्वागतार्ह वातावरण देखील राखते. याचे स्टँडर्ड कॅबिनेट क्लॅडींग स्टेनलेस ३०४ फिनिश मध्ये येते. शिवाय गोल्ड (GOLD) किंवा लॉबीच्या सौंदर्याच्या दृष्टीने सुयोग्य असणाऱ्या अन्य कोणत्याही रंगाचे पर्याय देखील उपलब्ध आहे.