ATM का बंद होत आहेत ? बॅंकांचा नेमका काय आहे विचार?

युपीआय - क्युआर कोडमार्फत ऑनलाईन पैसाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने बॅंकांनी आपल्या एटीएमची संख्या कमी करण्याचा सपाटा लावला आहे. देशात सध्या किती एटीएम आहेत, ऑनलाईन व्यवहार किती वाढले आहेत हे पाहूयात....

ATM का बंद होत आहेत ? बॅंकांचा नेमका काय आहे विचार?
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 1:44 PM

आपल्या परिसरात एटीएमच्या माध्यमातून बॅंकांनी कॅश काढण्यासाठी एटीएमची सोय केल्याने लोकांचे बॅंकात जाण्याचे प्रमाण कमी झाले. तरीही रोख रक्कम काढण्यासाठी आजही वापरली जाणारी ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजे ATM ची संख्या अचानक कमी झालेली आहे. कारण आजकाल क्युआर कोडने ऑनलाईन ट्राझक्शनचे व्यवहारांचे प्रमाण वाढलेले आहे. आता भारतात एकूण किती ATM लागलेले आहेत. एटीएमची संख्या नेमकी किती घटलेली आहे.आणि ऑनलाईन ट्राझक्शन / युपीआयमध्ये नेमकी किती प्रमाणात वाढ झालेली आहे. चला पाहूयात…

किती घटले एटीएम ?

अलिकडच्या वर्षांत एटीएमच्या संख्येत थोडीच वाढ झालेली आहे. परंतू सप्टेंबर 2024 च्या तुलना जर सप्टेंबर 2023 शी केली तर एटीएमच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. आरबीआयने दिलेली माहितीनुसार सप्टेंबर 2023 मध्ये एकूण एटीएमची संख्या 2,19,281 होती. सप्टेंबर 2024 मध्ये ती 2,15,767 झाली. म्हणजे एटीएमच्या संख्येत 1.6% घट झालेली आहे. ही जरी फार मोठी घट नसली तर या घसरणीने हे स्पष्ट होते आहे की बॅंका आता एटीएमवर जास्त खर्च करु इच्छीत नाहीत.

किती प्रकारचे एटीएम

बॅंकांकडे एटीएम देखील दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे ऑनसाईट एटीएम, म्हणजे जेथे बॅंक आहे त्या ब्रॅंचमधील एटीएम आणि दुसरे ऑफसाईट एटीएम जे बॅंकच्या आवासाबाहेर दूर कुठल्या तरी मॉल, स्थानक किंवा बाजारपेठे लावलेले एटीएम.

आकड्यांकडे पाहीले तर ऑफ साईट एटीएमच्या संख्येत गेल्या चार वर्षांत घट सुरु आहे.

सप्टेंबर 2021 मध्ये ऑफ साईट एटीएम 97,383 होते

सप्टेंबर 2022 मध्ये ऑफ साईट एटीएम 97,072 झाले सप्टेंबर 2023 मध्ये ऑफ साईट एटीएम 93,751 राहीले

सप्टेंबर 2024 मध्ये ऑफ साईट एटीएम 87,838 उरले

म्हणजे साल 2021 तुलनेत साल 2024 मध्ये ऑफ साईट एटीएमची संख्या सुमारे 10 टक्के घटली.

एटीएम इंस्टॉल करण्यासाठी बॅंकांना खूप पैसा खर्च करावा लागतो. एटीएमसाठी जागा घ्यावी लागते. काही ठिकाणी सिक्युरिटी ठेवावी लागते. सतत कॅश भरावी लागतो. आता येथून पुढे बॅंका आपले एटीएम वाढवणार की कमी करत जाणार आहे याकडे पाहावे लागणार आहे. कारण दुसरीकडे ऑनलाईट पेमेंट करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

किती वाढले ऑनलाईन व्यवहार

2019-20 मध्ये 3,40,026 लाख कोटी ऑनलाइन व्यवहार झाले

2019-20 मध्ये 3,40,026 लाख कोटी ऑनलाइन व्यवहार झाले

2020-21 मध्ये हे वाढून 4,37,445 लाख कोटी ट्रांझक्शन झाले

2020-22 मध्ये हे वाढून 7,19,531 लाख कोटी ट्रांझक्शन झाले

2022-23 मध्ये 11,39,476 लाख कोटी ऑनलाईन व्यवहार झाले

2023-24 मध्ये 16,44,302 लाख कोटी ऑनलाईन व्यवहार झाले यात एकट्या UPI मधून 13,11,295 लाख कोटी ऑनलाईन ट्रांझक्शन झाले होते. आणि जुलै 2024 एकट्या यूपीआय मधून 20 लाख कोटीहून अधिक ऑनलाईन ट्रांझक्शन झाले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.