Holiday : नोव्हेंबर महिन्यातही सुट्यांचा डाव रंगणार, इतके दिवस बँकांना राहणार ताळे..
Holiday : नोव्हेंबर महिन्यात बँकांना इतक्या दिवस सुट्या राहणार आहेत.
नवी दिल्ली : वर्षातील 10 महिना म्हणजे ऑक्टोबर (October) आता संपायला काही दिवस राहिले आहेत. सध्या दिवाळीच्या सुट्टीत बँकांचे (Bank Holiday) कामकाज प्रभावित झाले आहे. तुम्हाला सुट्या असल्या तरी सध्या बँकाही बंद आहेत. त्यामुळेच तुमचे बँकांतील काम थांबलेले आहे.नोव्हेंबर (November) महिन्यातही काही दिवस बँका बंद राहणार आहेत. तेव्हा कॅलेंडर पाहुनच बँकांचे कामकाज करायला घराबाहेर पडा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर महिन्यांच्या सुट्या जाहीर (Bank Holiday in November) केलेल्या आहेत. आरबीआयने सुट्यांची यादी जाहीर केली आहे. नोव्हेंबर महिन्यात एकूण 10 दिवस बँक बंद राहील.
या सुट्यांमुळे संपूर्ण देशभर एकाच दिवशी बँकांचे कामकाज प्रभावित होईल असे नाही. काही राज्यात ज्या दिवशी बँका बंद असतील, इतर राज्यात मात्र त्यादिवशी कामकाज सुरु असेल. त्या त्या राजातील सण आणि स्थानिक सुट्यांच्या आधारे बँकांच्या कामकाजात फरक दिसून येईल.
दरवर्षी RBI बँकांना सुट्टी जाहीर करते. पण देशातील सर्वच राज्यातील बँकांना एकाच दिवशी सुट्या नसतात. राज्यानुसार आणि स्थानिक सुट्यांनुसार त्यात बदल होतो. पण मोठ्या सणाला, राष्ट्रीय सणाला मात्र सर्वच बँकांना सुट्टी असते.
नोव्हेंबर महिन्यात 1,6, 8,11, 12, 13, 20,23,26,27 रोजी निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अॅक्टतंर्गत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी देशातील बँका बंद राहील. तर आता उर्वरीत दिवशीही बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे ग्राहकांना वेळतच त्यांची बँकेतील कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
1 नोव्हेंबर 2022 – कन्नड़ राज्योत्सव/कुट- बेंगळूरु आणि इंफाळमध्ये बँक बंद 6 नोव्हेंबर 2022 – रविवार 8 नोव्हेंबर 2022 – गुरुनानक जयंती/कार्तिका पूर्णिमा/रहास पूर्णिमा/वांगला फेस्टिवल अगरतळा, बेंगळुरु, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ,कोची, पणजी, पाटणा, शिलॉंग आणि तिरुवनंतपुरम वगळता इतर ठिकाणी बँका बंद राहतील. 11 नोव्हेंबर2022 – कनकदासा जयंती/वांग्ला फेस्टिवल- बेंगळुरू आणि शिलॉंगमध्ये बँक बंद 12 नोव्हेंबर 2022 – शनिवार 13 नोव्हेंबर 2022 – रविवार 20 नोव्हेंबर 2022 – रविवार 23 नोव्हेंबर 2022 – सेंग कुत्सनेम- शिलॉंगमध्ये बँक बंद 26 नोव्हेंबर 2022 – शनिवार 27 नोव्हेंबर 2022 – रविवार