बँकेची कामं तीन दिवसात आटपा, नाहीतर सोमवारपर्यंत थांबावं लागणार

गुरुवार 24 डिसेंबरपर्यंत बँकेची कामं न उरकल्यास सोमवार 28 डिसेंबरपर्यंत थांबावं लागेल

बँकेची कामं तीन दिवसात आटपा, नाहीतर सोमवारपर्यंत थांबावं लागणार
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 10:01 AM

मुंबई : तुम्हाला बँकेत जाऊन महत्त्वाची कामं करायची असतील, तर तीन दिवसात आटपून घ्या. अन्यथा तुम्हाला थेट सोमवारपर्यंत थांबावं लागणार आहे. कारण या आठवड्याच्या अखेरीस सलग तीन दिवस बँकांना सरकारी सुट्टी आहे. त्यामुळे गुरुवार 24 डिसेंबरपर्यंत बँकेची कामं न उरकल्यास सोमवार 28 डिसेंबरपर्यंत थांबावं लागेल. (Bank holidays falling on long weekend of 25th December)

सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाऊन करायची कामे ग्राहकांना येत्या गुरुवारपर्यंतच उरकून घ्यावी लागतील. शुक्रवार 25 डिसेंबरला नाताळनिमित्त बँकांना सुट्टी असेल. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी येणारा शनिवार हा ‘फोर्थ सॅटर्डे’ आहे. त्यामुळेच 26 डिसेंबरलाही बँका बंद असतील. तर 27 डिसेंबरला रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे बँका उघडणार नाहीत. अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असेल.

ज्या ग्राहकांना बँकेत जाऊन पैसे काढणे, भरणे, चेक जमा करणे अथवा अन्य महत्त्वाची कामं करायची आहेत, त्यांनी ती गुरुवारपर्यंत करणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात या कालावधीत ऑनलाईन व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस बँका बंद असतानाही तुम्ही ऑनलाईन ट्रँझॅक्शन सुरळीतपणे करु शकाल.

लाँग वीकेंड

वर्षाच्या अखेरीस अनेक जण मोठ्या सुट्ट्यांचं नियोजन करतात. वर्षभर साचलेल्या सुट्ट्या डिसेंबर महिन्यात संपवण्याची सवय अनेक जणांना असते. थंडीच्या मोसमात सहकुटुंब किंवा मित्र परिवारासोबत पर्यटनाची आखणी अनेक जण करतात. डिसेंबरचा शेवटचा आठवडा त्यामुळेच पर्वणी ठरत आहे. गुलाबी थंडीला लाँग वीकेंडची जोड मिळाल्यामुळे बहुतांश जणांनी विंटर हॉलिडेजचं प्लॅनिंग केलं आहे. या लाँग वीकेंडआधीच बँकेशी संबंधित कामं तुम्हाला उरकावी लागणार आहेत.

याही बातम्या वाचा :

नाईट कर्फ्यूच्या पावलांनी मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन येणार?

राज्यात हुडहुडी! निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, तर महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले

(Bank holidays falling on long weekend of 25th December)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.