ऑक्टोबर महिन्यात इतक्या दिवस बँकांना ताळे; दिवाळीपूर्वी असे करा कामाचं प्लॅनिंग
Bank Holidays October 2024 : या वर्षात ऑक्टोबर 2024 मध्ये बँकांना सुट्यांचा हंगाम आहे. RBI ने बँक सुट्यांची यादी जाहीर केली आहे. जर तुमचे पुढील महिन्यात काम असेल तर ही कामं झटपट उरकून घ्या. नाहीतर हे काम सुट्यांमुळे अडकून पडू शकते.
सप्टेंबर महिना संपायला आता दोन-तीन दिवस उरले आहेत. ऑक्टोबर महिन्याचा आता सुरू होईल. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सुट्यांचा हंगाम आहे. या महिन्यात गांधी जयंती (Gandhi Jayanti), नवरात्री (Navratri), दसरा (Dussehra) आणि दिवाळी (Diwali) सारख्या मोठ्या सणांची रेलचेल आहे. या काळात घराघरात साफसफाई, रंग-रंगोटी, स्वच्छतेची कामं हाती घेण्यात येतात. या सणासुदीत ऑक्टोबर महिन्यात सुट्यांचा पडाव राहणार आहे. अनेक दिवस बँकांना ताळे असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांसाठी सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे तुमची बँकेतील काही महत्वाची कामं असतील तर ती झटपट उरकून घ्या.
जवळपास 15 दिन बँकांना असेल सुट्टी
RBI प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच बँकेसंबंधीच्या सुट्यांची यादी जाहीर करते. या यादीनुसार, ऑक्टोबर महिन्यात 31 दिवसातील जवळपास 15 दिवस सुट्टी असेल. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्यांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती , नवरात्री , दसरा आणि दिवाळीच्या सुट्या आहेत. या दिवशी बँका बंद असतील.
ऑक्टोबर महिन्यात या दिवशी बँकांना ताळे
1 ऑक्टोबर – विधानसभा निवडणुकीसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये बँकांना ताळे
2 ऑक्टोबर – गांधी जयंतीमुळे संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल
3 ऑक्टोबर – नवरात्रीमुळे जयपूर येथे बँकांना सुट्टी
6 ऑक्टोबर – रविवारमुळे संपूर्ण देशातील बँकांना ताळे
10 ऑक्टोबर – दुर्गा पूजा, दसरा आणि महासप्तमीमुळे अगरतळा, गुवाहाटी, कोहिमा आणि कोलकत्तामध्ये बँकांना कुलूप
11 ऑक्टोबर – दसरा, महाअष्टमी, महानवमी, आयुध पूजा, दुर्गा पूजा, आणि दुर्गा अष्टमीमुळे अगरतळा, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाल, ईटानगर, कोहिमा, इंफाल, कोलकत्ता, पाटणा, रांची आणि शिलांगमध्ये बँकांचे शटर डाऊन
12 ऑक्टोबर – दसरा, विजयादशमी, दुर्गा पूजेमुळे जवळपास संपूर्ण देशातील बँका बंद
13 ऑक्टोबर – रविवारमुळे संपूर्ण देशात बँकांना असेल ताळे
14 ऑक्टोबर – दुर्गा पूजेमुळे गंगटोकमधील बँकांना सुट्टी
16 ऑक्टोबर – लक्ष्मी पूजेसाठी अगरतळा आणि कोलकत्ता येथील बँकांना कुलूप
17 ऑक्टोबर – महर्षि वाल्मीकि जयंती आणि कांटी बिहू सणानिमित्त बेंगळुरू आणि गुवाहाटीतील बँकांना सुट्टी
20 ऑक्टोबर – रविवारमुळे बँकांना सुट्टी
26 ऑक्टोबर – चौथ्या शनिवारमुळे देशातील बँकांना सुट्टी
27 ऑक्टोबर – रविवार असल्याने बँकांना सरकारी सुट्टी
31 ऑक्टोबर – दिवाळीमुळे देशभरातील बँकांना सुट्टी
ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु
सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.