दिवाळीनंतर सुट्यांचा मुक्काम; नोव्हेंबर महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, मग असा करा व्यवहार

Bank Holidays list in November 2024 : नोव्हेंबर महिन्यात दिवाळीसारखीच धामधूम आहे. दिवाळीनेच या महिन्याची सुरूवात होत आहे. तर या महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा हंगाम आहे. तो महिनाभर पुरणार आहे. या महिन्यात या तारखेला सुट्यांचा मुक्काम आहे. आता अनेक व्यवहार ऑनलाईन करता येतात. पण महत्त्वाचे काम असेल तर ते अगोदरच उरकून घ्या.

दिवाळीनंतर सुट्यांचा मुक्काम; नोव्हेंबर महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, मग असा करा व्यवहार
नोव्हेंबर महिन्यात सुट्यांची रेलचेल
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 9:24 AM

या महिन्याची सुरुवातच दिवाळीपासून होत आहे. लक्ष्मी पूजनानंतर संपूर्ण महिन्यात दिवाळीसारखीच धामधूम असेल. राज्यात या महिन्यात विधानसभा निवडणूक (Maharashatra Vidhansabha Election 2024) आहे. रविवार आणि शनिवार या दिवसा व्यतिरिक्त पण सुट्या आहेत. राज्यनिहाय या सुट्यांचा पडाव आहे. तर काही दिवशी देशभरात एकाच दिवशी बँकेला सुट्टी आहे. तर काही खास सणांची राहुटी त्या त्या राज्यात असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर महिन्यातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार या दिवशी बँकांचे कामकाज होणार नाही.

नोव्हेंबर महिन्यातील सुट्यांची यादी

नोव्हेंबर महिन्यात सणांचा मांडव आहे. आज 1 नोव्हेंबर रोजी अमावस्येला लक्ष्मी पूजन, कुट सण, कन्नड राज्योत्सव, बलीपद्ममी, विक्रम संवत नव वर्ष दिन, छटपूजा, गुरू नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि इतर अनेक सण आहेत. या दिवशी बँकांचे कामकाज होणार नाही. त्यातही राज्यनिहाय या सुट्या देण्यात येतील. तर काही सुट्या संपूर्ण देशात लागू असतील. या काळात बँका बंद असतील. त्या सुट्यापाहून बँकेतील तुमच्या कामाचे नियोजन करा.

हे सुद्धा वाचा

नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँका बंद

1 नोव्हेंबर : दीपावली, कुट महोत्सव आणि कन्नड़ राज्योत्सवामुळे त्रिपुरा, कर्नाटक, उत्तराखंड, जम्मू आणि कश्मीर, महाराष्ट्र, मेघालय, सिक्किमसह मणिपूरमध्ये बँकांना ताळे असेल.

2 नोव्हेंबर : बलि प्रतिपदा, बालीपद्ममी, लक्ष्मी पूजा, गोवर्धन पूजा, विक्रम संवत नववर्ष दिनानिमित्त गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्किम, राजस्थान, उत्तर प्रदेशातील बँका बंद असतील.

3 नोव्हेंबर : संपूर्ण देशातील बँका बंद असतील.

7 नोव्हेंबर : बंगाल, बिहार, झारखंड सारख्या राज्यात छटपूजेमुळे बँका बंद असतील.

8 नोव्हेंबर : बिहार, झारखंड आणि मेघालयमध्ये छटपूजेमुळे, वंगला सणानिमित्त बँका बंद

9 नोव्हेंबर : महिन्यातील दुसरा शनिवार, देशभरातील बँका बंद असतील

10 नोव्हेंबर : संपूर्ण देशातील बँका बंद असतील.

12 नोव्हेंबर : उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंडीगड, उत्तराखंड, हैदराबाद-तेलंगणा, अरूणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, नागालँड, बंगाल, उत्तर प्रदेश, नई दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, श्रीनगर येथे ईगास-बग्वालनिमित्ताने बँकांचे कामकाज होणार नाही.

15 नोव्हेंबर : मिझोरम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंडीगड, उत्तराखंड, हैदराबाद-तेलंगणा, अरूणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, नागालँड, बंगाल, उत्तर प्रदेश, नई दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, श्रीनगर मध्ये गुरु नानक जयंती/कार्तिक पौर्णिमा/रहस पौर्णिमेनिमित्त बँका बंद असतील.

17 नोव्हेंबर : रविवारमुळे बँकांना सुट्टी

18 नोव्हेंबर : कर्नाटकमध्ये कनकदास जयंतीमुळे बँकांना सुट्टी

23 नोव्हेंबर : मेघालयात सेंग कुत्सनेमनिमित्त बँकांना सुट्टी, दुसरा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँकांना सुट्टी

24 नोव्हेंबर : रविवारमुळे बँकांना सुट्टी

ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु

सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....