UPI लागले कामाला, व्यवहारच नाही तर आता कर्ज पण मिळवा, बँकांची योजना तरी काय?
UPI Loan : सध्या युपीआयचा वापर वाढला आहे. भाजी ते दागदागिने खरेदीपर्यंत, दिल्ली ते गल्लीपर्यंत UPI चा वापर होता. पण आता लवकरच तुम्हाला युपीआयच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी बँकांनी एक जबरदस्त योजना आखली आहे.
डिजिटल इंडियाच्या दिशेने भारताचे पाऊल पडले आहे. युपीआय पेमेंटमुळे व्यवहार अगदी सहज आण सोपे झाले आहे. भाजी ते दागदागिने खरेदीपर्यंत, दिल्ली ते गल्लीपर्यंत UPI चा वापर होता. कोणत्याही छोट्या व्यवहारासाठी आता युपीआयचा सर्रास वापर होत आहे. पण आता ही व्यवस्था अजून एक पाऊल पुढे टाकणार आहे. बँका तुम्हाला युपीआयच्या माध्यमातून कर्ज सुविधा देणार आहे.
देशातील अनेक मुख्य बँका युपीआय वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी युपीआय ॲपच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याची योजना आखत आहेत. जर अशी सुविधा सुरु झाली तर ग्राहकांना मोठा फायदा होईल. त्यामुळे एका क्लिकवर कर्जाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होईल.
बँकांनी तयार केली योजना
देशातील अनेक बँकांनी युपीआय ॲपवर ग्राहकांना कर्ज देण्याची योजना आखली आहे. बँक ग्राहकांना युपीआय ॲपवर कर्ज देण्याची व्यवस्था करु शकते. अर्थात हे कर्ज एफडी, मुदत ठेवीच्या बदल्यात त्यांना मिळेल. अर्थात बँकेत तुम्ही जी मुदत ठेव ठेवणार, ती तारण मानून बँक ग्राहकांना कर्ज देईल. त्यासाठी युपीआय ॲपवर लोन ऑफर स्कीम सुरू करण्यात येऊ शकते. युपीआय सेवांचे व्यवस्थापन करणाऱ्या राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) याविषयीची अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. पण क्रेडिट लाईन ऑन युपीआय सर्व्हिस ही सुविधा देण्यात येऊ शकते.
खासगी बँका देऊ शकतात ही ऑफर
युपीआयवर एफडीच्या बदल्यात कर्ज देण्याची योजना सर्वात अगोदर खासगी बँका करु शकतील. त्यासाठी त्यांना एनपीसीआयसोबत मिळून सध्याच्या युपीआय व्यवस्थेत बदल करावा लागेल. ईटीच्या एका वृत्तानुसार, खासगी बँका या व्यवस्थेमुळे त्या ग्राहकांपर्यंत पोहचतील, जे त्यांचे ग्राहक नाहीत. या व्यवस्थेमुळे बँकेत खाते नसणाऱ्या ग्राहकांना सुद्धा कर्ज मिळू शकेल. तर बँकांच्या मुदत ठेवी वाढण्यास हातभार लागेल.
हा कर्ज व्यवहार सुरक्षित असेल. त्याचा ग्राहकांना फायदा होईल. सध्या अनेक खासगी ॲप कर्ज देत असले तरी, त्यांची वसूली आणि अव्वाच्या सव्वा व्याजदरामुळे अनेक ग्राहकांचे आयुष्य उद्धवस्त झाल्याच्या घटना घडल्या आहे. असुरक्षित कर्जाविषयीची आरबीआयची चिंता पण कमी होईल. तर डिजिटल माध्यमामुळे स्वस्त आणि सुरक्षित कर्ज पुरवठ्याचा मार्ग सुकर होईल.