Bank Loan | व्याजातूनच व्हाल मालामाल; बँकेला कर्ज देऊन करा जबरदस्त कमाई

Bank Loan | आपल्या प्रत्येकाला पैशांची गरज असते. त्यासाठी आपण बँकेत जातो. बँकेकडे कर्ज मागतो. पण जर तुम्हीच बँकेला कर्ज दिले आणि त्यावर व्याज कमावले तर? असं होऊ शकतं. व्याजातून जबरदस्त कमाई करता येऊ शकते. कशी आहे ही प्रक्रिया, कसा मिळेल तुम्हाला पैसा..

Bank Loan | व्याजातूनच व्हाल मालामाल; बँकेला कर्ज देऊन करा जबरदस्त कमाई
Image Credit source: TV9 Graphics
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 10:33 AM

नवी दिल्ली | 23 February 2024 : बँकिंग पद्धत ही सरळ सरळ मागणी आणि पुरवठा या फॉर्म्युलावर काम करते. अनेक जण बँकेत खाते उघडतात. त्यात थोडी-थोडी रक्कम बचत म्हणून टाकतात. तुमची ही बचत, बँक दुसऱ्या ग्राहकाला कर्ज म्हणून देते. ही पूर्ण सायकल पूर्ण करण्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची असेल? साहाजिकच, व्याज. कर्जावर बँक व्याज कमावते आणि जो बचत करतो. आरडी,एफडी करतो, त्यांना पण पैसा देते. पण जर तुम्हीच बँकेल कर्ज दिले आणि त्यावर कमाई केली तर? ही कमाई आरडी आणि एफडी पेक्षा अधिक असेल. नाही का?

बँकेला कर्ज देऊन कमाई

तर बँकेला कर्ज देऊन तुम्ही कमाई करु शकता. बँकेला कर्ज दिल्यावर व्याजाच्य रुपाने जबरदस्त कमाई करता येते. जु्न्या काळात सावकार व्याज देऊन पैसे कमावत होते. आजही अनेक ठिकाणी ही पद्धत आहे. बँकेकडे न जाता लोक सावकाराकडे जातात. पण तुम्ही पण बँकेला कर्ज देऊन कमाई करु शकता.

हे सुद्धा वाचा

बँकेला द्या कर्ज आणि करा कमाई

RBI नियंत्रित एक NBFC, ‘लिक्वलोन्स’ या नावाने आहे. ही संस्था पीअर 2, पीअर कर्ज पुरवठा करते. ही एफबीएफसी कर्ज देणारे आणि कर्ज घेणारे यांच्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये कर्ज देणाऱ्याला त्याच्या रक्कमेवर, कर्जावर तगडा रिटर्न, परतावा मिळतो. ही संस्था, प्लॅटफॉर्म आतापर्यंत 4400 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज वितरण केले आहे. ही कंपनी लोकांकडून रक्कम जमा करते आणि गरजवंतांना कर्जाचा पुरवठा करते. कंपनी खासकरुन नो-कॉस्ट ईएमआय वा पगारदारांना कर्ज देण्यावर भर देते.

व्याजातून होते मोठी कमाई

आरबीआय या कंपनीचे नियंत्रण करते. ही छोटी वित्त संस्था आहे. जर तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून कर्ज देता, तर तुम्हाला या कर्जावर चांगले व्याज मिळेल. ही संस्था गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांपर्यंत व्याज देते. हा व्याजदर एफडीपेक्षा चांगला मानण्यात येतो. पण गुंतवणूक करण्यापूर्वी अटी आणि शर्ती एकदा वाचून घ्या. त्यामुळे तुम्हाला पुढे फसगत झाल्यासारखे वाटणार नाही. ही कर्ज देण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. तुम्ही गुगलवर लिक्वीलोन सर्च करुन त्यावर नोंदणी करु शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा गुंतवणुकीचा सल्ला अजिबात नाही, तर केवळ माहिती आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.