Bank of Baroda देतीये स्वस्तात घर खरेदीची संधी; 24 मार्चला बँकेकडून गहान संपत्तीचा लिलाव
आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं, प्रत्येक जण घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहातो. अशावेळी जर तुम्हाला तुमचे ड्रीम होम स्वस्तात मिळाले तर तुमचा आनंद दुप्पट होऊ शकतो. घर खरेदी करू पहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशीच संधी बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) उलब्ध करून दिली आहे.
आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं, प्रत्येक जण घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहातो. अशावेळी जर तुम्हाला तुमचे ड्रीम होम स्वस्तात मिळाले तर तुमचा आनंद दुप्पट होऊ शकतो. घर खरेदी करू पहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशीच संधी बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) उलब्ध करून दिली आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) च्या वतीने बँकेकडे गहान असलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव (Mega e-Auction) येत्या 24 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे. तुम्ही देखील या प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या हक्काचं घर किंवा दुकान खरेदी करू शकता. 24 मार्चला बँक ऑफ बडोदाच्या वतीने थकबाकिदारांच्या प्रॉपर्टीचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात सहभागी होऊन तुम्ही देखील तुमच्या बजेटनुसार बोली लावू शकता. बँकेची ही संपत्ती वेगवेगळ्या राज्यात आहे. त्यामुळे बोली लावण्यापूर्वी तुम्ही एकदा बँकेच्या वतीने संपत्तीच्या विवरनाबाबत जारी करण्यात आलेली लीस्ट एकदा आवश्य चेक करून घ्या.
‘या’ वेबसाईटवर मिळवा संपत्तीची संपूर्ण माहिती
बँक ऑफ बडोदाकडून या लिलावाबाबत त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅडलवर माहिती देण्यात आली आहे. बँकेच्या वतीने येत्या 24 मार्च 2022 रोजी संपत्तीचा लिलाव करण्यात येणार असून, या लिलावात तुम्हाला तुमच्या बजेटनुसार घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे या लिलावात सहभागी होण्याचे आवाहन बँकेच्या वतीने ट्विटद्वारे करण्यात आले आहे. सोबतच ज्या संपत्तीचा लिलाव होणार आहे . त्या संपत्तीच्या विवरणासंदर्भात सविस्तर माहिती असलेल्याल वेबसाईटची लिंक http://bit.ly/MegaEAuctionMarch देखील बँकेंच्या वतीने देण्यात आली आहे.
बँकेकडून कोणत्या संपत्तीचा लिलाव करण्यात येतो?
बँकेकडून अशा सर्व संपत्तीचा लिलाव करण्यात येतो, जी संपत्ती लोकांनी बँकेकडे गहान ठेवून कर्ज घेतलेले असते. अनेक जण बँकेकडून सपत्ती गहान ठेवून कोट्यावधीचे कर्ज घेतात. मात्र पुढे काही अडचणींमुळे ते कर्जाची परतफेड करू शकत नाहीत. अशा व्यक्तींना एकदा दोनदा बँकेकडून संधी देण्यात येते. मत्र तरी देखील ते जर कर्जाची परतफेड करू शकले नाही, तर त्यांचा समावेश हा एनपीएमध्ये होतो. त्यानंतर बँक आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी संपत्तीचा लिलाव करते.
Ab karein apni life ki best investment. Participate in the Mega e-Auction on 24.03.2022 by #BankofBaroda aur kharidein apni dream property with ease. Know more https://t.co/Jeq8bKupcH#AzadKaAMritMahotsav @AmritMahotsav pic.twitter.com/05XsWgwhIg
— Bank of Baroda (@bankofbaroda) March 17, 2022
संबंधित बातम्या
Credit score म्हणजे काय रे भाऊ? खराब क्रेडिट स्कोरचे तोटे समजून घ्या
Home loan डिफॉल्ट झालंय? चिंता करू नका, ‘असे’ फेडा आपल्या घराचे हप्ते