बँकेत मुलींसाठी अकाऊंट उघडा, रोज 35 रुपये टाका, मिळवा पाच लाख रुपये

मोदी सरकारने 2 डिसेंबर 2014 रोजी सुकन्या समृद्धी योजना सुरु केली होती. सुकन्या समृद्धी योजनेत वर्षाला 7.6 टक्के व्याज आणि करमाफी मिळते. | sukanya samruddhi

बँकेत मुलींसाठी अकाऊंट उघडा, रोज 35 रुपये टाका, मिळवा पाच लाख रुपये
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 9:51 AM

मुंबई: देशातील अग्रगण्य सरकारी बँकांपैकी एक असणाऱ्या बँक ऑफ बडोदामध्ये ( Bank of Baroada) सुकन्या समृद्धी खाते उघडणाऱ्या ग्राहकांना विशेष लाभ मिळणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेत इतर सरकारी योजनांच्या तुलनेत जास्त लाभ मिळतो. या योजनेतंर्गत तुम्ही रोज 35 रुपये गुंतवले तरी तुम्हाला काही वर्षांतच खात्यामध्ये पाच लाख रुपये जमा होऊ शकतात. (Bank of Baroda sukanya samruddhi ssy details)

बँक ऑफ बडोदाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने 2 डिसेंबर 2014 रोजी सुकन्या समृद्धी योजना सुरु केली होती. सुकन्या समृद्धी योजनेत वर्षाला 7.6 टक्के व्याज आणि करमाफी मिळते.

सुकन्या समृद्धी योजनेत आतापर्यंत मिळालेले व्याज

एप्रिल 1, 2014: 9.1% एप्रिल 1, 2015: 9.2% एप्रिल 1, , 2016 -जून 30, 2016: 8.6% जुलै 1, 2016 -डिसेंबर 30, 2016: 8.6% ऑक्टोबर 1, 2016- डिसेंबर 31, 2016: 8.5% जुलै 1, 2017-डिसेंबर 31, 2017 8.3% जानेवारी 1, 2018 -मार्च 31, 2018 : 8.1% एप्रिल 1, , 2018 – जून 30, 2018 : 8.1% जुलै 1, 2018 -डिसेंबर 30, 2018 : 8.1% ऑक्टोबर 1, 2018 – डिसेंबर 31, 2018 : 8.5% जानेवारी 1, 2019 – मार्च 31, 2019 : 8.5%

सध्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्के इतका आहे.

सुकन्या समृद्धी योजना खाते कोण उघडू शकते?

मुलगी जन्माला आल्यापासून दहा वर्षांची होईपर्यंत पालक सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतात.

अवघ्या 250 रुपयांत अकाऊंट ओपन

सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बँक खाते उघडण्यासाठी अवघे 250 रुपये लागतात. पालकांनी वर्षाला खात्यामध्ये 20 हजार जमा केल्यास 14 वर्षात 2,80,000 रुपयांची रक्कम होते. 21 वर्षांच्या मॅच्युरिटी पिरीडयनंतर ही रक्कम दहा लाख इतकी होते. तर रोज 35 रुपये या हिशेबाने वर्षाला 12000 रुपये जमा केल्यास 21 वर्षांच्या मॅच्युरिटी पिरीडयनंतर ही रक्कम पाच लाख इतकी होते.

LIC ची खास योजना, प्रत्येक महिन्याला मिळतील 16000; आताच करा गुंतवणूक

देशातली सगळ्यात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच खास योजना आणत असते. आताही LIC ने अशीच खास योजना ग्राहकांनसाठी आणली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90 दिवस ते 55 वर्षे वयोगटातील लोकांसाठी ही एक एन्डॉयमेंटसह जीवन विमा योजना आहे.

एलआयसीची ही योजना वयाच्या 100 वर्षांपर्यंत कव्हर करते. या पॉलिसीच्या मॅच्युअरिटीची रक्कम 100 वर्षे पूर्ण झाल्यावर मिळेल. जर पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याने भरलेला सर्व प्रीमियम नामित व्यक्तीला परत केला जाईल. LIC जीवन उमंग योजना असं या खास योजनेचं नाव आहे. यामध्ये प्रीमियम पेमेंट कालावधीनंतर विमाराशीच्या 8 टक्के रक्कम आयुष्यासाठी किंवा 100 वर्षे वयापर्यंत दिली जाते. जर एखाद्या व्यक्तीने वयाची 100 वर्षे पूर्ण केली तर कंपनी एकरकमी रक्कम विमाधारकास देईल. इतकंच नाहीतर वयाच्या 100 व्या वर्षी पॉलिसीधारकास सम अ‍ॅश्युअर्ड, सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम एडिसन बोनस दिला जाईल.

संबंधित बातम्या:

वयाच्या 30 व्या वर्षी व्हाल करोडपती, आता फक्त 30 रुपये गुंतवा आणि श्रीमंत व्हा!

(Bank of Baroda sukanya samruddhi ssy details)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.