Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apple | ॲपलचा एक निर्णयाने चीनमध्ये भूकंप, आता भारतात तयार होणार आयफोनचे हे मॉडल

Apple | ॲपलने चीनच्या स्वप्नांना पुन्हा एकदा सुरुंग लावला. एका रिपोर्टनुसार 2025 मधील आयफोनचे नवीन मॉडेल येईल. त्यावर मेक इन इंडियाची मोहर उमटलेली असेल. हे मॉडेल पण भारतात तयार होणार आहे. यामुळे ॲपलने पुन्हा चीन बाहेर आयफोन तयार करण्याचे ठरवल्याचे दिसून येते. हा चीनसाठी मोठा धक्का तर भारतासाठी संधी आहे.

Apple | ॲपलचा एक निर्णयाने चीनमध्ये भूकंप, आता भारतात तयार होणार आयफोनचे हे मॉडल
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 4:36 PM

नवी दिल्ली | 3 नोव्हेंबर 2023 : चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले. त्यानंतर झिरो कोविड नियमांचा चीनला मोठा फटका बसला. जगभरातील कंपन्यांनी चीनमध्ये काही दशकांपासून तंबू टाकला होता. त्या कंपन्यांनी आता उत्पादनासाठी इतर देशांचा रस्ता धरला आहे. या कंपन्यांनी भारत जवळ केला आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोरोनाने कमकुवत झाली आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी टेक कंपनी ॲपलने भारतात एंट्री केली. आयफोन 15 भारतात तयार करण्यात आला. त्यानंतर आता इतर कंपन्यांनी चीन सोडून भारताला पसंती दिली आहे. चीनला चूक उमगली. पण तोपर्यंत अनेक कंपन्यांनी गाशा गुंडाळला आहे. आयफोनचे नवीन मॉडल लवकरच भारतात तयार होणार आहे.

हे मॉडल भारतात तयार होणार

ॲपलने पुन्हा एकदी चीनला आस्मान दाखवले. ॲपल कंपनी आयफोन 17 चे उत्पादन भारतात करणार आहे. त्यामुळे या आयफोन 17 वर मेड इन चायना नाही तर मेड इन इंडिया अशी मोहर असेल. हा चीनसाठी मोठा झटका मानण्यात येतो. चीनमध्ये स्वतंत्र आयफोन सिटी आहे. याठिकाणी फॉक्सकॉन मोठ्या प्रमाणात उत्पादन करते. या नवीन घोषणेमुळे या आयफोन सिटीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकल्प असेच बाहेर गेले तर या प्रकल्पातील कर्मचारी, कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळू शकते.

हे सुद्धा वाचा

2025 मध्ये आयफोन 17

गेल्या काही दिवसांपासून भारतात मोबाईल उत्पादनाला सुगीचे दिवस आले आहे. त्यामागे केंद्र सरकारने घेतलेली भूमिका मानण्यात येते. अनेक धोरणं बदलविण्यात आली आहे. परदेशी कंपन्यांसाठी पायघड्या टाकल्या जात आहे. PLI Scheme ने हा बदल घडवला आहे. ॲपलचा आयफोन भारतात असेम्बल होतो. ॲपलचे विश्लेषक ची कू यांनी एक रिपोर्ट तयार केला आहे. त्यात 2025 मध्ये आयफोन 17 लाँच होईल, तो पूर्णपणे मेड इन इंडिया असेल असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्यांदा ॲपल चीनबाहेर आयफोनची उत्पादन करणार असल्याचे समोर आले आहे.

केव्हा होणार उत्पादन सुरु

भारतात आयफोन 17 चे उत्पादन 2024 मधील दुसऱ्या तिमाहीत सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा थेट अर्थ चीनला झटका बसणार आहे. ची कू च्या रिपोर्टनुसार, 2024 पर्यंत भारतात आयफोन उत्पादन 25 टक्के होईल. तर जागतिक बाजारात भारताचा आयफोनमधील वाटा 12 ते 14 टक्क्यांनी वाढेल. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागेल.

माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.