Partner : या संधीचे सोने कराच, गुंतवा काही हजार नी कमवा लाखो, या ब्रँडमध्ये करा गुंतवणूक..

Partner : मित्रांनो संधीच तशी आहे, ही गुंतवणूक तुम्हाला मालामाल केल्याशिवाय राहणार नाही.

Partner : या संधीचे सोने कराच, गुंतवा काही हजार नी कमवा लाखो, या ब्रँडमध्ये करा गुंतवणूक..
बना आरोग्यदूत, कमवा लाखोImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 8:27 PM

नवी दिल्ली : देशातील या मोठ्या ब्रँडने(Brand) तुम्हाला मालामाल करण्यासाठी खास ऑफर आणली आहे. तुम्हाला ही या संधीचा (Opportunity) लाभ घेता येईल. मंदीच्या काळातही (Recession Time) या व्यवसाय जोरदार सुरु होता. आता तुमच्या लक्षात आलेच असेल की आम्ही कोणत्या व्यवसायाची गोष्ट करत आहोत ते..

हेल्थकेअर आणि फार्मसी हा असा व्यवसाय आहे की जो मंदीच्या काळातही रॉकेटसारखा जोरात चालला. आता या क्षेत्रात तुम्हाला कमाईची संधी मिळत आहे. त्यासाठी अगदी अल्प गुंतवणूक करावी लागणार आहे.

आता तुम्ही म्हणाल क्षेत्र कळले, पण कंपनी कोणती आहे ते सांगा. तर मित्रांनो ही कंपनी आहे, टाटा समुहाची. टाटा समुहाच्या 1mg या औषधी वितरण कंपनीचे नाव तर तुम्हाला माहितीच असेल. या कंपनीने भागीदारी योजना आणली आहे. या योजनेत अत्यंत कमी गुंतवणूक करुन तुम्हाला लाखोची कमाई करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

टाटा हा भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँड आहे. टाटाच्या 1mg या ई-फार्मसी कंपनीसोबत काम करण्याची अनोखी संधी तुम्हाला मिळत आहे. या पार्टनरशीप योजनेचे नाव 1mg Health Partner असे आहे.

आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि या क्षेत्रात जागरुकता वाढवण्यासाठी कंपनीने ही योजना आणली आहे. त्यासाठी कंपनी देशभरात हेल्थ पार्टनर (Health Partner) शोधत आहे. आतापर्यंत 600 आरोग्यदूत या योजनेत जोडल्या गेले आहेत. आता तुम्हाला संधी आहे.

या योजनेतंर्गत तुम्हाला मार्केटिंग आणि त्याचे तंत्रज्ञान शिकवण्यात येणार आहे. डिलिव्हरीवर तुम्हाला इन्सेटिंवही देण्यात येणार आहे. या व्यवसायासाठी भागीदारांना कंपनी प्रशिक्षणही देणार आहे. तसेच तुमचे कार्य पाहून तुम्हाला पुढील संधीही देण्यात येणार आहे.

जर तुम्हालाही या योजनेत भागीदार व्हायचे असेल तर Tata 1mg च्या अधिकृत संकेतस्थळावर जा. त्याठिकाणी अर्ज करा. त्यात तुमची संपूर्ण माहिती योग्यरित्या भरा. प्रोफाईल शॉर्टलिस्ट करुन कंपनी तुम्हाला कॉल करेल.

त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड, जीएसटी, पत्त्याचा पुरावा यासारखी माहिती द्यावी लागेल. या प्लॅटफॉर्मसोबत काम करण्यासाठी तुम्हाला 15000 रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम नॉन रिफंडेबल म्हणजे परत मिळणार नाही. ही प्रक्रिया तुम्हाला सात दिवसांत पूर्ण करावी लागेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.