Petrol-Diesel Price : अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त, क्रूड ऑईल घसरले

Petrol-Diesel Price : राज्यात पेट्रोलच्या किंमतीत किंचित घसरण झाली असून डिझेलच्या दरही घसरले आहेत.

Petrol-Diesel Price : अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त, क्रूड ऑईल घसरले
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 8:25 AM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत (Crude Oil Price) घसरण सुरु आहे. त्याचा मोठा परिणाम भारतीय बाजारात दिसून आला नाही. पण काही राज्यात दरात नगण्य फरक पडला आहे. काही दिवसांपूर्वी कच्चे तेल 100 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहचले होते. त्यानंतर किंमती आता जवळपास 80 डॉलर प्रति बॅरलवर येऊन पोहचल्या आहेत. अर्थात तेल विपणन कंपन्यांचा अजब दावा आहे. त्यांच्या मते, गेल्या सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या भावात (Petrol-Diesel Price Today) कुठलीही दरवाढ करण्यात आली नाही. कंपन्यांना मध्यंतरी जादा दराने क्रूड ऑईल खरेदी करावे लागले होते. त्याचा तोटा अद्यापही भरुन निघालेला नाही. पेट्रोलियम मंत्र्यांनीही कंपन्यांचीच री ओढली आहे. परिणामी देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर असल्या तरी त्या कमी मात्र झालेल्या नाहीत.

गुरुवारी सकाळी ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत 0.60 डॉलरची घसरण झाली. सध्या त्याचा भाव 84.38 डॉलर प्रति बॅरल आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 0.76 डॉलर घसरुन 78.72 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. दोन दिवसांपूर्वी कच्चे तेल महागले होते. किंमती 100 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहचल्या होत्या.

महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 57 पैशांची घसरण झाली. आजचा पेट्रोलचा भाव 105.96 रुपये प्रति लिटर झाला. तर डिझेल 54 पैशांनी स्वस्त झाले. डिझेल 92.49 रुपये प्रति लिटरवर पोहचले. मध्यप्रदेशात पेट्रोल 30 पैशांची स्वस्त झाले. या राज्यात भाव 109.70 रुपये प्रति लिटर झाले. तर डिझेल 28 पैशांनी घसरले. डिझेलची विक्री 94.89 रुपये प्रति लिटरने होत आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर पोहचले. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर, चेन्नईत पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर तर कोलकत्तामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरवर पोहचले.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे (How to check diesel petrol price daily through SMS) जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.