एटीएममध्ये कार्ड टाकण्यापूर्वी खरचं दोन वेळा Cancel बटण दाबावं लागतं?
अनेकदा पैसे काढण्यासाठी आपण एटीएमचा वापर करतो. मात्र हेच एटीएम आता तुमचा घात करु शकतं. त्यामुळे सर्वांसाठी महत्त्वाची सुचना..
मुंबई : सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी सर्रास करतो. मात्र पैसे काढण्यासाठी एटीएम मशिनमध्ये कार्ड टाकण्यापूर्वी जर तुम्ही दोनदा Cancel हे बटण दाबलं नाही. तर तुमचा पिन हॅक होऊ शकतो. असा मॅसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मॅसेज खरा की खोटा आहे याचं वास्तव ‘टीव्ही 9 मराठी’ने जाणून घेतलं आहे.
बँकेचे व्यवहार आता फार सोपे झालेत. फोन बँकिंग, मोबाईल अप, इंटरनेट बँकींग यांसारखे अनेक पर्याय ग्राहकांसमोर बँकांनी दिले आहे. त्यामुळे घरबसल्या आपल्याला बँकेचे सर्व व्यवहार करता येतात. अनेकदा पैसे काढण्यासाठी आपण एटीएमचा वापर करतो. मात्र हेच एटीएम आता तुमचा घात करू शकतं. त्यामुळे सर्वांसाठी महत्त्वाची सुचना.. एटीएममध्ये कार्ड टाकण्यापूर्वी दोन वेळा Cancel बटण दोनदा दाबा. अन्यथा एटीएममध्ये लावलेल्या ट्रॅपमध्ये तुमचा पिन क्र. चोरी किंवा कॉपी होऊ शकतो. असा मॅसेज सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल होत आहे.
या पोस्टमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकले, कार्ड विसरल्याने पैसे गहाळ होणे या सर्वसामान्य माणसांद्वारे होणाऱ्या चुका आहे. मात्र अशाप्रकारे जर तुमचा पिन क्रमांक हॅक होणार असेल तर मग काय उपयोग असा प्रश्न सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान व्हायरल होणारी ही पोस्ट खरी की खोटी हे जाणून घेण्यासाठी टीव्ही 9 मराठी ने तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यावेळी तज्ज्ञांनी ही पोस्ट खोटी असल्याचे स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी आरबीआयने ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा निर्देश जारी केले होते. त्यानुसार
- तुमच्या एटीएमचा पिन कोणलाही सांगू नका.
- एटीएमचा CVV कोड अनोळखी व्यक्तीला शेअर करु नका.
- मोबाईलवरील ओटीपी नंबर कोणलाही शेअर करु नका.
- तुमच्या मोबाईलवरील ओटीपी क्र. कुणाशी शेअर करू नका.
आरबीआयने दिलेल्या या निर्देशात कुठेही एटीएममध्ये कार्ड टाकण्यापूर्वी Cancel बटण दाबा असा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही पोस्ट खोटी असल्याचं ‘टीव्ही 9 मराठी’च्या व्हायरल वास्तव मध्ये स्पष्ट झालं आहे.