मुंबई : आता कोणताही व्यवहार करायचं असेल तर कुणीही रोख रक्कम वापरत नाही. किंवा पगार झाला की तो बँकेतून (Bank) देखील काढला जात नाही. फोन-पे (PhonePay) आणि गुगल पे (Google Pay) सारख्या ऑनलाईन व्यवहाराच्या सुविधा अल्याने आजकाल व्यवहार देखील ऑनलाइन झाले आहेत. आपण अगदी कितीही रुपयांचा व्यवहार अगदी सहज या अॅपमधून करू शकतो. त्याला कोणताही अडथळा येत नाही. मात्र, या डिजिटल स्पर्धेत केंद्र सरकारने तयार केलेलं भीम अॅप (Bhim App) मागे पडलंय. लोकांची या अॅपला फारशी पसंती नसल्याचं दिसतंय. सरकार या अॅपला युजर फ्रेंडली देखील करू शकलेलं नाही. त्यामुळे लोकांना अडचण आली की ते लगेच सोप्या आणि साध्या अॅपचा उपयोग करू लागतात. त्यामुळे गुगल पे आणि फोन पे हे दोन्ही अॅप वापरनं लोक जास्त पसंत करतायेत. दरम्यान, या डिजिटल युगात भीम अॅपचा प्रभाव चांगलाच कमी झाल्याचं दिसतयं.
डिजिटल व्यवहार वाढावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम अॅप सादर केलं होतं. विशेष म्हणजे हे अॅप इंटरनेटशिवाय देखील काम करतं. याला आधार कार्डची गरज असते. या अॅपच्या माध्यमातून लोकांना पैसे देता किंवा घेता येतात. परंतु लोक याचा फारसा वापर करताना दिसत नाहीत. एकीकडे डिजिटल व्यवहारांना पसंती मिळत आहे. मात्र, दुसरीकडे भीम अॅपला लोक फार पसंत करत नसल्याचं दिसतंय. ऑनलाईन व्यवहारांमध्ये दिवसागणिक वाढत होत आहे. 2022 मध्ये ऑनलाईन व्यवहारांचा आकडा एक हजार बिलियन डॉलरपर्यंत पोहोचलाय. ऑनलाईन व्यवहारांचा सर्वाधिक वापर प्रवासादरम्यान करण्यात येत आहे. ऑनलाईन व्यवहारात सध्या गुगल पे अॅपने 54 टक्के मार्केटवर ताबा मिळवला आहे. दुसऱ्या स्थानावर 11.9 टक्क्यांवर फोन पे आहे. तिसऱ्या स्थानावर 9.7 टक्के पेटीएम आहे. त्यानंतर 8.5 टक्क्यांवर व्हॉट्सअॅप आणि पाचव्या स्थानी म्हणजे शेवटी भीम अॅप आहे.