AI Hub : भारत होणार AI हब! रिलायन्सनंतर टाटा समूहासोबत या कंपनीचा वायदा

AI Hub : जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनीने भारतातील दोन मोठ्या उद्योग समूहासोबत हातमिळवणी केल्याचे जाहीर केले. यामध्ये टाटा समूह आणि रिलायन्स समूहाचा समावेश आहे. भारतात कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञान(AI) हब तयार करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

AI Hub : भारत होणार AI हब! रिलायन्सनंतर टाटा समूहासोबत या कंपनीचा वायदा
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 9:29 AM

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : जगात सध्या कृत्रिम बुद्धिमतेचा (AI Technology) बोलबाला सुरु आहे. अनेकांना नोकरी जाण्याची भीती सतावत आहेत तर या तंत्रज्ञानामुळे कमी कालावधीत झटपट काम उरकेल. मनुष्यबळ कमी लागेल असे काही दावे करण्यात येत आहे. भारत लवकरच एआय हब होण्याच्या तयारीत आहे. जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industry) आणि टाटा समूहासोबत (Tata Group) त्यांनी सहकार्य कराराची घोषणा केली. शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी याविषयीची माहिती देण्यात आली. या नव्या घडामोडींमुळे देशातील उदयोन्मुख पिढीला मोठा फायदा होईल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. तर काहींना हे तंत्रज्ञान अनेक क्षेत्रात मनुष्याचे काम हिसकावून घेईल अशी भीती वाटत आहे.

NVIDIA आणणार क्रांती

NVIDIA Inks ही कंपनी भारतात या आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी करणार आहे. त्यासाठी रिलायन्स समूह आणि टाटा समूहाशी हातमिळवणी करण्यात आली आहे. बाजारात चीनला शह देण्यासाठी भारताला विकासाच्या वाटेने जाणे क्रमप्राप्त आहे. चिप आणि सेमीकंडक्टर उत्पादनासाठी भरीव प्रयत्न करण्यात येत आहे. आता एआय तंत्रज्ञानासाठी जमीन कसण्यात येत आहे. रिलायन्स कंपनी त्यांच्या फाऊंडेशन लार्ज लँग्वेज मॉडलसाठी(LLM) काम करत आहे. देशातील विविध भाषांमध्ये सहज संवाद साधता यावा, सहज आणि योग्य भाषांतर व्हावे यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी AI टूल्स आणण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. NVIDIA Inks त्यासाठी खास मदत करणार आहे. (Latest News Marathi)

हे सुद्धा वाचा

सुपर कम्प्युटरला टाकेल मागे

दोन्ही कंपन्या एआय पायाभूत सुविधा तयार करण्यावर भर देणार आहे. त्यामाध्यमातून रिलायन्स आणि Nvidia Inks भारतातील सुपर कम्युटरला पण मागे टाकेल. त्यापेक्षा अधिक वेगाने हे तंत्रज्ञान काम करेल. सध्या रिलायन्स AI इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलिकॉम युनिट, रिलायन्स जिओ इन्फोकॉमसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.

कंपनीकडे 3800 कर्मचारी

NVIDIA Inks ने 2004 साली भारतात व्यवसाय थाटला. या कंपनीकडे अनेक क्लाएंट आहेत. या कंपनीचे देशात 4 इंजिनिअरिंग सेंटर आहेत. यामध्ये गुरुग्राम, हैदराबाद, पुणे आणि बेंगळुरु यांचा समावेश आहे. या सेंटरमध्ये सध्या 3800 कर्मचारी काम करत आहेत. भीती नको

कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence-AI) सध्या जोरदार चर्चेत आहे. हॉलिवूडमधील लेखक आणि कलाकार त्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. तर अनेकांना नोकऱ्या जाण्याचा धोका सतावत आहे. काहीं सरकारांना माहितीचा गैरवापर वाढण्याची भीती सतावत आहे. संगणक, कम्प्युटर आले तेव्हा पण अशीच धास्ती होती. भीती होती, पण त्याचा मोठा तोटा झाला नाही. तसाच एआयचा पण बाऊ करण्याची गरज नसल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.