अर्ध्या किंमतीत खरेदी करा Hero Maestro EDGE स्कूटर, पाहा खास ऑफर

तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

अर्ध्या किंमतीत खरेदी करा Hero Maestro EDGE स्कूटर, पाहा खास ऑफर
Hero Maestro Edge
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 8:30 PM

मुंबई : तुम्हाला एखादी स्कूटर खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला स्कूटर खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत Hero Maestro EDGE स्कूटर खरेदी करु शकाल.

गेल्या काही वर्षांपासून देशातील ग्राहकांकडून हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) च्या स्कूटर्सना चांगली पसंती मिळत आहे. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये या स्कूटरच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी एक चांगली ऑफर घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्ही Hero Maestro EDGE स्कूटर अवघ्या 32,990 रुपयात खरेदी करू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

अवघ्या 33 हजारात Hero Maestro EDGE

CredR वर तुम्हाला केवळ 32,900 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Hero Maestro EDGE स्कूटर खरेदी करता येईल. ही स्कूटर 110cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही फर्स्ट ओनर स्कूटर आहे. ही स्कूटर खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वॉरंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या स्कूटरची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-scooters-in-Delhi-NCR-Rani-Bagh/Hero-Maestro-EDGE/15092) जाऊन या स्कूटरबाबतची माहिती घेऊ शकतात. ही स्कूटर दिल्ली एनसीआर क्षेत्रात उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही स्कूटर फक्त 26,340 किलोमीटर धावली आहे. यात तुम्हाला स्कूटर, टायर्स, इंजिन, परफॉरमन्स, एक्सटीरियर बॉडी, फोर्क असेंबली, मीटर सेक्शन, फ्रंट आणि रियर व्हील सेक्शनच्या फीचर्सविषयीची माहिती मिळेल.

(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

इतर बातम्या

70 हजारांची Honda Activa अवघ्या 25 हजारात, कुठे मिळतेय ऑफर?

Hero MotoCorp 16 मेपर्यंत दुचाकींची निर्मिती करणार नाही, जाणून घ्या कारण

इंधन दरवाढीवर जालीम उपाय, एकदा चार्ज करा आणि सुस्साट फिरा, 130KM रेंजसह ई. स्कूटर बाजारात

(Buy Hero Maestro EDGE in just Rs 33000 by CredR)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.