Best Multibagger Penny Stocks :1 लाखांचे थेट झाले 18 लाख, या पेनी स्टॉकने 18 महिन्यात दिला बंपर रिटर्न

साधारण दीड वर्षांपूर्वी बीएसईवरील या शेअरची किंमत केवळ 0.29 पैसे इतकी होती. त्याची किंमत आता 4.97 रुपये झाली आहे. गेल्या आठवड्यात 12 एप्रिल रोजी हा शेअर 5.25 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या 18 महिन्यात या शेअरने 1700 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे.

Best Multibagger Penny Stocks :1 लाखांचे थेट झाले 18 लाख, या पेनी स्टॉकने 18 महिन्यात दिला बंपर रिटर्न
आर्सेलर मित्तलची बक्कळ कमाईImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 9:19 AM

शेअर बाजारात (Share Market) किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. विशेषत: कोरोना काळात झपाट्याने डिमॅट खाती (Demat Account) उघडण्यात आली. किरकोळ गुंतवणूकदार ब-याचदा पेनी स्टॉक्स (Penny Stocks) शोधतात, जे उत्तम परतावा देऊन त्यांना मालामाल करतात. कवडीमोल भावात मिळणा-या या पेनी स्टॉक्सच्या परताव्याचा विचार करता, त्यांनी गुंतवणुकदार आणि विश्लेषकांना अंचबित केले आहे. त्यांनी चांगला परतावा देण्याचा विक्रम केला आहे, जो सर्वांना धक्का देणारा आहे. अत्यंत कमी गुंतवणुकीत काही दिवसांतच मालामाल होण्याचा प्रयत्न नव्याने आलेले गुंतवणुकदार करतात. अद्विक कॅपिटल Advik Capital हा असाच एक पेनी स्टॉक आहे ज्याने गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिकचा परतावा दिला आहे. गेल्या 18 महिन्यात या शेअरने 1700 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे.

दीड वर्षात शेअरमध्ये 1700% वाढ

साधारण दीड वर्षांपूर्वी बीएसईवरील या शेअरची किंमत केवळ 0.29 पैसे इतकी होती. त्याची किंमत आता 4.97 रुपये झाली आहे. गेल्या आठवड्यात 12 एप्रिल रोजी हा शेअर 5.25 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या 18 महिन्यात या शेअरने 1700 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे.. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 18 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर शेअरमध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ही गुंतवणूक कायम ठेवली असती तर या गुंतवणुकदाराला छप्पर फाडके रिर्टन्स मिळाले असते. एक लाख रुपये गुंतवणुकीवर त्याला 18 लाखांचा परतावा मिळाला असता.

सहा महिने ते एका वर्षापर्यंत असा मिळाला परतावा

अलीकडच्या काळात या शेअरने चांगला परतावा दिला आहे. गेल्या एका आठवड्यात हा शेअर 1.22 टक्क्यांनी वधारला आहे. या एका महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, या काळात अद्विक कॅपिटलच्या शेअरमध्ये जवळपास 31% वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यात सुमारे 46 टक्के वाढ झाली आहे, तर यंदा आतापर्यंत हा शेअर 71 टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या एक वर्षातही त्याने मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत. या काळात याच्या किंमतीत सुमारे 340 टक्क्यांनी वाढ झाली आहे

बीएसई, एनएसईला टाकले मागे

या शेअरने अजून एक विक्रम त्याच्या नावे केला आहे. बीएसई सेन्सेक्स, एनएसई निफ्टी यांंना परताव्याबाबत या शेअरने पिछाडीवर टाकले आहे. गेल्या 18 महिन्यांत स्टॉक मार्केट केवळ 50 टक्के वाढू शकले आहे. निफ्टी 50 ही फार काही कमाल दाखवू शकलेले नाही. मात्र याच कालावधीत अद्विकने विक्रम केला आहे. परताव्याच्या बाबतीत त्याने शेअर मार्केटला मागे टाकले आहे. हा शेअर 18 महिन्यांत तब्बल 1700 रुपयांनी वधरला आहे. त्याचप्रमाणे या 18 महिन्यांत बीएसई सेन्सेक्स सुमारे 48 टक्क्यांनी वधारण्यात यशस्वी झाला आहे. सध्या अद्विक कॅपिटलची मार्केट कॅप सुमारे 110 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 15 लाख रुपयांचा नफा झाला होता, तर महसुलाचा आकडा 6.13 कोटी रुपये होता.

(इशारा : शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेक धोके असतात, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही स्वत:च अभ्यास केला पाहिजे तसेच गुंतवणुकीपूर्वी वित्तसल्लागाराचा सल्ला घ्यायला हवा.)

संबंधित बातम्या

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी लोन हवंय? चिंता सोडा, SBI कडून ग्राहकांसाठी खास ऑफर

इंधनाचे नवे दर जारी, सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये; जाणून घ्या राज्याच्या प्रमुख शहरातील दर

इंडोनेशियामध्ये Palm Oil चा तुटवडा; …तर भारतामध्ये खाद्यतेलाचे दर आणखी वाढणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.