गुगल पे, फोन पेला BHIM लोळवणार मातीत; सरकारने सुविधांचा खुराक वाढवला

BHIM UPI : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सध्या गुगल पे, फोन पे आणि इतर युपीआय पेमेंट ॲपचा बोलबाला आहे. 2016 साली बाजारात येऊन सुद्धा सरकारच्या BHIM ला बाजारातील शेअर वाढवता आला नाही. पण आता या पैलवानाला सुविधांचा खुराक देण्यात येत आहे.

गुगल पे, फोन पेला BHIM लोळवणार मातीत; सरकारने सुविधांचा खुराक वाढवला
'BHIM' पराक्रम लवकरच
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 2:34 PM

सरकारी पेमेंट ॲप BHIM बाजारात धमाका करण्यास उत्सुक आहे. 2016 साली बाजारात येऊन सुद्धा भीमला बाजारात कोणतीच जोरदार कामगिरी करता आली नाही. गुगल पे, फोन पे आणि आता संकटात सापडलेल्या पेटीएमसह इतर पेमेंट ॲपने मोठा पसारा वाढवला. पण आता भीम पुन्हा बाजारात मोठा पल्ला गाठण्यासाठी सज्ज झाले आहे. बाजारातील दिग्गज ॲपला भीम थेट फाईट देईल. या पैलवानाला आखाड्यात उतरविण्यासाठी सुविधांचा खुराक देण्यात येत आहे.

बाजारात दाखवणाक दमखम

Open Network for Digital Commerce (ONDC) च्या मदतीने मेकओव्हर करण्यात येणार आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, गुगल पे, फोन पेची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी भीम युपीआय ॲपमध्ये आवश्यक ते बदल आणि रणनीती ठरविण्यात येत आहे. या ॲपच्या मदतीने खाद्यान्न आणि शीतपेय, किराणा, फॅशन आणि कपडे खरेदीवर ऑफर्स देण्यात येतील.

हे सुद्धा वाचा

संधीचे सोने करणार

सध्या डिजिटल मार्केटमध्ये गुगल पे आणि फोन पे हे सध्या सुरमा आहेत. दिग्गज खेळाडू आहेत. पेटीएमवरील संकटांमुळे भीमला तिसऱ्या क्रमांकावर उडी घेण्याची मोठी संधी आहे. त्यासाठी ॲपमध्ये अमुलाग्र बदल आणि धोरणात बदल करणे गरजेचे आहे. ओएनडीसीचे माजी उपाध्यक्ष राहुल हांडा यांना आता भीम ॲपचे मुख्य व्यावसायिक अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.

मग भीम का नाही दाखवू शकत पराक्रम

गुगल पे, फोन पे हे थर्ड पार्टी पेमेंट ॲप म्हणून सध्या भारतात लोकप्रिय आहेत. पेटीएमवरील निर्बंधामुळे आता तिसरी जागा रिक्तच म्हणावी लागेल. या जागेवर टुणकन उडी मारण्याची नामी संधी भीमला आहे. इतर पेमेंट ॲप बाजारात दमदार कामगिरी करत असताना भीम का पराक्रम दाखवू शकत नही, या प्रश्नाचं लवकरच भीम ॲप उत्तर देणार आहे. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या एका वृत्तानुसार, 5-7 दशलक्ष व्यापार असलेल्या पेटीएमचा मोठा वाटा भीमला मिळू शकतो. त्यासाठी धोरण आखण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....