केजी अनिल कुमार हे गुडविल ॲम्बेसेडर; लॅटिन अमेरिकन कॅरिबियन व्यापार परिषदेची घोषणा

Goodwill Ambassador : आयसीएल फिनकॉर्पचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक केजी अनिल कुमार यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. त्यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लॅटिन अमेरिकन कॅरिबियन व्यापार परिषदेने ही घोषणा केली आहे.

केजी अनिल कुमार हे गुडविल ॲम्बेसेडर; लॅटिन अमेरिकन कॅरिबियन व्यापार परिषदेची घोषणा
लॅटिन अमेरिकन कॅरिबियन व्यापार परिषदेने केला केजी अनिल कुमार यांचा सन्मान
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 3:56 PM

लॅटिन अमेरिकन कॅरिबियन व्यापार परिषदेने (LACTC) केजी अनिल कुमार यांची लॅटिने कॅरिबियन (LAC) क्षेत्रासाठी सदिच्छा दूत (Goodwill Ambassador) म्हणून घोषणा केली. या नियुक्तीसाठी एका विशेष कार्यक्रम घेण्यास परीषद अत्यंत उत्सूक आहे. या घोषणेमुळे सर्व देशातील पर्यटन आणि व्यापार वृद्धीला मोठी बळकटी मिळेल. भारतासाठी त्यांची ही नियुक्ती या देशातील संबंध दृढ आणि मजबूत करणारी ठरणार आहे.

केजी अनिल कुमार यांची ही नियुक्ती आयसीएल फिनकॉर्पच्या भारत, मध्य पूर्वी आणि इतर 33 एलएसी देशांसाठी महत्वाची असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. यामुळे या देशांमधील व्यापार आणि पर्यटन संबंध वाढवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना बळकटी मिळेल. केजी अनिल कुमार यांचा व्यापक अनुभव आणि नेतृत्वाचा फायदा होईल. त्यांच्या नियुक्तीच्या विशेष कार्यक्रमात आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या परिषदेच्या कार्यावर प्रकाश पडेल.

केजी अनिल कुमार यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती

भारत सरकारने पण केजी अनिल कुमार यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. त्याचे क्युबासह अनेक एलएसी सरकारांनी स्वागत केले आहे. ICL Fincorp चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक केजी अनिल कुमार यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्यांमध्ये, विशेषतः क्युबासोबत भारताचे संबंध दृढ करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांची सदिच्छा दूत म्हणून ही नवीन भूमिका ही संपूर्ण एलएसी देशांमधील व्यापार आणि पर्यटन वाढीसाठी अनुकूल ठरेल. ती या देशांमध्ये परस्पर हितसंबंध जोपासण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. या खास कार्यक्रमाला निमंत्रित अतिथी, राजकीय, विविध व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर आणि इतर अनेक जणांची उपस्थित असेल. लवकरच हा कार्यक्रम होणार आहे.

हे सुद्धा वाचा

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.