युके हायकोर्टाकडून नीरव मोदीला मोठा झटका; आता लवकरच भारतात परतणार?
एप्रिलमध्ये युकेच्या गृहसचिव प्रीती पटेल यांनी मोदीच्या भारत प्रत्यार्पणासाठी एक आदेश जारी केला होता. (Big blow to Nirav Modi from UK High Court, will he return to India soon)
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेसह 14 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीला युके हायकोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. युके हायकोर्टाने नीरव मोदी याच्या भारत प्रत्यार्पणाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. एप्रिलमध्ये युकेच्या गृहसचिव प्रीती पटेल यांनी मोदीच्या भारत प्रत्यार्पणासाठी एक आदेश जारी केला होता. (Big blow to Nirav Modi from UK High Court, will he return to India soon)
या प्रकरणासंदर्भात तेथील उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, नीरव मोदीची याचिका लेखी नाकारली गेली आहे. मोदीला अजूनही मौखिक सुनावणीची संधी आहे. कायदेशीररित्या नीरव मोदीकडे मौखिक सुनावणीसाठी अपील करण्यासाठी पाच वर्किंग डे ची संधी असेल. ही अंतिम मुदतही पुढच्या आठवड्यात संपेल.
जानेवारी 2018 मध्ये पळून गेला होता नीरव मोदी
नीरव मोदी जानेवारी 2018 मध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या पैशांचा घोटाळा करुन लंडनमध्ये पळून गेला होता. त्याच्यावर बॅंकेच्या अधिकाऱ्यांना लेटर ऑफ अंडरटेकिंग्सठी लाच दिल्याचा आरोप आहे आणि अशा प्रकारे त्याने बँकेची फसवणूक केली. तसेच त्याला 19 मार्च 2019 रोजी लंडनमध्ये अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर तो तुरूंगात आहे. तो सध्या दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहात बंद आहे.
प्रत्यार्पणाचा नवीन कायदा मोदीला लागू होणार नाही
वेस्टमिन्स्टर कोर्टाचे न्यायाधीश सॅम गूझी आपल्या निर्णयात म्हणाले होते की, सर्व सुनावणीनंतर असे दिसून येते की नीरव मोदीला भारतीय कोर्टासमोर प्रश्नांची उत्तरे देण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत, प्रत्यार्पणासंदर्भात नवीन युके कायदा लागू होत नाही.
सीबीआय, ईडीकडून स्वतंत्र चौकशी
या प्रकरणात सीबीआय आणि ईडी स्वतंत्रपणे तपास करत आहेत. नीरव मोदीचे भारतात आगमन झाल्यावर दोन्ही एजन्सी स्वतंत्रपणे चौकशी करतील. इतका मोठा घोटाळा कसा झाला याची चौकशी सीबीआय करेल, तर या पैशांची उधळपट्टी कशी झाली याची ईडी चौकशी करेल. (Big blow to Nirav Modi from UK High Court, will he return to India soon)
कोरोनोमुळं दोन दिवसांचं अधिवेशन, जिल्हा परिषद निवडणुकांना कोणता डेल्टा ना कोणता व्हायरस, फडणवीस आक्रमकhttps://t.co/mAQyakdtaX#Devendrafadnavis | #BJP | #MVA | #bhagatsinghkoshyari | @BJP4Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 23, 2021
इतर बातम्या
Video | माणूस कारमधून उतरताच शेकडो माकडांची गर्दी, नेमके कारण काय ? पाहा व्हिडीओ