नोटबंदीनंतर आता मोठा निर्णय; आता ही बँक खाती रडारवर, मोदी सरकार करणार सर्जिकल स्ट्राईक

Banking Fraud Modi Government : देशाने नोटबंदीचा अनुभव घेतला आहे. त्यानंतर गुलाबी नोटबंदी करण्यात आली. आता नागरिकांना अजून एका सर्जिकल स्ट्राईकला सामोरं जावं लागणार आहे. पण या स्ट्राईकचा उलट फायदाच होणार आहे. आता या बँक खात्यावर मोदी सरकार स्ट्राईक करणार आहे.

नोटबंदीनंतर आता मोठा निर्णय; आता ही बँक खाती रडारवर, मोदी सरकार करणार सर्जिकल स्ट्राईक
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 9:18 AM

देशात इंटरनेट जसे स्वस्त झाले. तसा त्याचा वापर वाढला. आता 5G आणि 6G कडे देशाचा प्रवास सुरू झाला आहे. पण त्यासोबतच सायबर चाच्यांचे, सायबर गुन्हेगारांचे जाळे सुद्धा फोफावले आहेत. त्यांच्या जाळ्यात अडकून अनेकांचा मेहनतीचा पैसा गायब होत आहे. आता डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रकार वाढला. या सायबर भामट्यांवर नकेल कसण्यासाठी केंद्र सरकार सज्ज झाले आहे. त्यांच्या मुळावरच आता घाव घालण्यात येणार आहे. बोगस बँक खाती (Mule Bank Account) आता रडारवर आली आहेत.

बोगस बँक खाती रडारवर

केंद्र सरकारने बोगस बँक खाती बंद करण्याची तयारी केली आहे. बोगस खाती शोधण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून बँकिंग फसवणुकीवर रोख लावण्याचा प्रयत्न होणार आहे. यामुळे बोगस बँक खात्यांची माहिती समोर येईल. ‘म्यूलहंटर डॉट एआई’ या आधुनित तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्रीय बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. त्याचा उपयोग करून अवघ्या काही मिनिटात अशा बोगस खात्याची माहिती समोर येईल.

हे सुद्धा वाचा

बोगस खात्यांवर कशी होणार कारवाई?

आर्थिक सेवा सचिव एम. नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली याविषयीची एक बैठक झाली. त्यात बँकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, म्यूल, बोगस खात्यांवर धडक कारवाई करावी आणि सर्वच बँकांनी अशा बोगस खात्यासंदर्भातील माहिती एकमेकांना शेअर करावी यावर भर देण्यात आला.

वित्तीय सेवा विभागाने याविषयी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. नागरिकांच्या मेहनतीचा पैसा वाचवण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षतेसाठी सक्रिय आणि आवश्यक उपाय करणे गरजेचे असल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच यासाठी सर्व बँकांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे धोरण ठरवण्यास सूचवण्यात आले आहे.

बोगस खात्यांचा कसा करण्यात येतो वापर?

बोगस बँक खात्याचा वापर सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसा लुबाडण्यासाठी करतात. दुसर्‍याच व्यक्तीच्या कागदपत्रांआधारे अशी बँक खाती उघडण्यात येतात. सायबर गुन्हेगार लोकांना फसवणूक जी रक्कम वसूल करते, तो पैसा या बँक खात्यात जमा करण्यात येतो. एकदा या खात्यात पैसा आला की तो अन्य वेगवेगळ्या खात्यात जातो आणि मग सायबर गुन्हेगाराच्या मूळ खात्यात हस्तांतरीत होतो. त्यामुळे तो वसूल करणे अवघड होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.