Cement Rate : हीच ती वेळ स्वस्तात मस्त घर बांधण्याची; सीमेंट आणि सळईच्या भावात मोठी घसरण
स्वतःचं घर (house) बांधण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. काही महिन्यांपूर्वी गगनाला भिडलेले सीमेंट (Cement) आणि सळ्यांचे भाव आता कमी होत आहेत. मजबूत घर बांधण्यासाठी सीमेंट आणि सळईचे महत्त्वाचे योगदान असते.
स्वतःचं घर (house) बांधण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. काही महिन्यांपूर्वी गगनाला भिडलेले सीमेंट (Cement) आणि सळ्यांचे भाव आता कमी होत आहेत. मजबूत घर बांधण्यासाठी सीमेंट आणि सळईचे महत्त्वाचे योगदान असते. आता सीमेंट आणि सळ्यांचे दर कमी झाल्यानं बांधकामाचा खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळे ड्रीम होम (Dream home) बांधण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही योग्य वेळ आहे. सरकारनं स्टीलवरील आयात शुल्क वाढवल्याने देशांतर्गत बाजारात स्टीलचे दर कमी झाले आहेत. सळयांचे भाव कमी होण्यालाही तेच मुख्य कारण आहे. मार्च-एप्रिलमध्ये सळईच्या दरात मोठी वाढ झाली होती. गेल्या काही दिवसांत सळईच्या दरात पुन्हा तेजी दिसत आहे. परंतु मार्च एप्रिलच्या दराच्या तुलनेत आता सळी स्वस्त मिळत आहे. तसेच सीमेंटचे दर देखील 40 ते 50 रुपयांनी कमी झाले आहेत.
सीमेंटच्या दरात घसरण
टीएमटी सळ्यांची किरकोळ किंमत एप्रिलच्या सुरुवातीला 75,000 रुपये प्रतिटन एवढी होती, जूनमध्ये सळ्याचे दर घसरून 65,000 रुपयांपर्यंत खाली आले.एप्रिलमध्ये सळ्यांची किरकोळ किंमत 82,000 पर्यंत पोहोचली होती. ती आता कमी होऊन 66 ते 68 हजार रुपये प्रति टन झालीये, म्हणजेच सळ्या आता प्रति टन 15,000 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत, अशी माहिती रिअल इस्टेट डेव्हलपर रमेश शर्मा यांनी दिलीये. काही दिवसांपूर्वी भौगोलिक आणि राजकीय कारणांमुळे कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सीमेंटच्या किंमती वाढल्या. एप्रिल महिन्यात सीमेंटच्या 50 किलो पोत्याचा दर 450 रुपयांवर पोहचला होता. परंतु आता 400 रुपयांना सीमेंटचं पोतं मिळत असल्यानं दिलासा मिळालाय. अंबुजा आणि अल्ट्राटेक सीमेंटच्या किंमती कमी होऊ 385 रुपयांवर आल्या आहेत.
वीट, वाळू महागली
एप्रिलच्या तुलनेत सळ्या आणि सीमेंटच्या किंमती कमी आहेत. सीमेंटचे दर आणखाी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे मॉन्सून आणि पावसामुळे वीट आणि वाळूच्या पुरवठ्यात अडथळा आल्यानं किंमती काही प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र पुरवठा व्यवस्थित सुरू झाल्यास पुढील एक महिन्यामध्ये वीट आणि वाळूच्या किमती देखील कमी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे येत्या काळात घराच्या बांधकामाचा खर्च कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.