Multibagger Stock : 98 पैशांच्या शेअरची कमाल! 25 पट परतावा एकाच वर्षात

Multibagger Stock : या मल्टिबॅगर स्टॉकने कमाल केली, अवघ्या एका वर्षातच 25 पट नफा मिळवून दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांना जॅकपॉट लागला आहे.

Multibagger Stock : 98 पैशांच्या शेअरची कमाल! 25 पट परतावा एकाच वर्षात
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 4:01 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) केव्हा काय होईल, ते काही सांगता येत नाही. कधी कधी मोठा खड्डा पडतो. तर काहींना जॅकपॉट लागतो. शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून तेजीत आहे. बाजाराने मोठा पल्ला गाठला आहे. बीएसई आणि एनएसईने उत्साह दुणावला आहे. एका पेन्नी शेअरने गुंतवणूकदारांचे नशीब उघडलं आहे. या शेअरने एकाच वर्षांतच 25 पट नफा मिळवून दिला. या स्टॉकची किंमत एका वर्षात 98 पैशांहून थेट 25 रुपयांवर पोहचली आहे. शेअर बाजाराची कामगिरी पाहता, या पेन्नी स्टॉकने मोठी भरारी घेतल्याचे दिसून येते.

गुंतवणूकदारांना 25 पट परतावा मर्क्युरी ईव्ही-टेक लिमिटेड (Mercury EV-Tech) देशातील इलेक्ट्रिकल व्हेईकल उत्पादन क्षेत्रातील एक कंपनी आहे. इलेक्ट्रिक स्कूटर्स पासून ते कार तयार करेपर्यंत ही कंपनी या व्यवसायात गुंतलेली आहे.इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात निर्मितीचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनी तिची उपकंपनी PowerMetz Energy Private Limited च्या माध्यमातून 2W आणि 3W लिथियम-आयन बॅटरीची निर्मिती करणार आहे.

एका वर्षात किती दिला परतावा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत करणाऱ्या या कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले. या कंपनीने गुंतवणूकदारांना 2,579.59 टक्क्यांचा परतावा दिला. ज्या गुंतवणूकदारांनी यापूर्वी गुंतवणूक केली होती. त्यांना आता 25 पटीने परतावा मिळाला. गेल्या वर्षी 20 जून 2022 रोजी मर्क्युरी ईव्ही-टेकच्या शेअरची किंमत 0.98 रुपये होती. गुरुवारी सकाळी 11.27 वाजता हा शेअर 26.26 रुपयांवर होता. शेअर बाजारात या शेअरला अनेकदा अप्पर सर्किट लागले आहे.

हे सुद्धा वाचा

अंदाज काय एका वर्षांत हा शेअर सुसाट धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्यावर्षी 20 जून 2022 रोजी हा शेअर 98 पैशांना मिळत होता. त्याच्या पुढच्या महिन्यात हा शेअर 20 जुलै रोजी 2.44 रुपयांवर पोहचला. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी 5.24 रुपये, 20 सप्टेंबर रोजी 8.79 रुपयांवर हा शेअर पोहचला. त्यानंतर या शेअरमध्ये घसरण दिसून आली. दोन महिन्यांच्या घसरणीनंतर हा शेअर पुन्हा वधारला. Mercury EV-Tech च्या शेअरने गुरुवारी मोठी उसळी घेतली. हा शेअर 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तरावर पोहचला. गुरुवारी हा शेअर 26.26 रुपयांवर पोहचला. या शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 98 पैसे आहे.

डोळे झाकून खरेदी नको शेअर बाजार हा मोठा समूद्र आहे. याठिकाणी मोठा मासा, लहान मासोळ्यांची शिकार करतो. शेअर बाजारात तुम्ही दिवसागणिक काही ना काही शिकता. नवनवीन अनुभव गाठिशी जोडता. चुका केल्या, पैसा गेला तर ती एकप्रकारची गुरु दक्षिणाच असते. या छोट्या छोट्या चुकांतून तुम्ही शिकला तर काही वर्षात तुम्ही भूलथापांना बळी पडत नाहीत.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.