मोठी बातमी, Amazon, Flipkart चे विक्रेते ईडीच्या रडारवर, मनी लॉड्रिंगप्रकरणात तपास
Money Laundering ED : व्यापार जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. Amazon, Flipkart चे काही विक्रेते ईडीच्या रडारवर असल्याचे समोर येत आहे. मनी लॉड्रिंगसारख्या गंभीर प्रकरणात हा तपास करण्यात येत आहे. याविषयीची संपूर्ण माहिती समोर आली नसली तरी ईडीच्या चौकशीने आता ई-कॉमर्स जगतात खळबळ उडाली आहे.
ई-कॉमर्स जगतात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाच्या (The Enforcement Directorate-ED) कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. Amazon, Flipkart चे काही विक्रेते ईडीच्या रडारवर असल्याचे समोर येत आहे. मनी लॉड्रिंगसारख्या गंभीर प्रकरणात हा तपास करण्यात येत आहे. याविषयीची संपूर्ण माहिती समोर आली नसली तरी ईडीच्या चौकशीने आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे विक्रेते रडारवर आले आहेत. गुरूवारी याविषयीची कारवाई झाल्याचे समोर येत आहे. CNBC TV-18 ने याविषयीचे वृत्त दिले आहे.
या शहरात चौकशी सत्र
या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या काही विक्रेत्यांवर ईडीला संशय आहे. हे विक्रेते मनी लॉड्रिंगप्रकरणात अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने काही ठिकाणी छापेमारी केली आहे. काही ठिकाणी तपास अजूनही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. देशातील जवळपास दोन डझन ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई हाती घेण्यात आल्याचे समोर येत आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळरु शहरासह इतर ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी तपासाचे काम सुरू आहे.
फेमाचे उल्लंघन केल्याचा ठपका
या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे Appario Retail, Shreyash Retail, Darshita Retail, Ashiana retail सारख्या काही विक्रेत्यांची चौकशी सुरू असल्याचे वृत्त न्यूज 18 ने दिले आहे. देशातील अनेक शहरातील 24 ठिकाणी ईडीची टीम पोहचली असून चौकशी करण्यात येत आहे. हा तपास अद्यापही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्यातंर्गत (FEMA) काही नियमांचे उल्लंघन तर झाले नाही यादृष्टीने हा तपास सुरू आहे. अर्थात या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने या घडामोडींविषयी अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या काही विक्रेत्यांचे आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आले आहेत. या व्हेंडर्सच्या व्यवहारातील अनियमितता खटकल्याने एकाचवेळी देशभरात ही कारवाई करण्यात आली आहे. अर्थात अद्याप काय कारवाई करण्यात आली याविषयीची माहिती समोर आलेली नाही. याविषयीचा तपास प्रगतीपथावर आहे.