Paytm FASTag विषयी मोठा निर्णय, NHAI चा दणका, असा होईल परिणाम

Paytm FASTag | पेटीएमला अजून मोठा झटका बसला आहे. फास्टॅगसाठी अधिकृत 32 बँकांमध्ये आता नवीन यादीत पेटीएमचे नाव हटविण्यात आले आहे. या यादीत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एक्सिस बँक, युको बँक यांचा समावेश आहे. पेटीएम ग्राहकांसाठी ही महत्वाची बातमी आहे.

Paytm FASTag विषयी मोठा निर्णय, NHAI चा दणका, असा होईल परिणाम
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 2:11 PM

नवी दिल्ली | 16 February 2024 : पेटीएम ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेला दणका दिला आहे. अनेक अनियमितता समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली होती. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पेटीएम बँक सोडून इतर 32 बँकांची फास्टटॅगसाठी अधिकृत बँक म्हणून मान्यता दिली आहे. एनएचएआयने अधिकृत बँकेकडूनच FASTag खरेदीचा सल्ला दिला आहे. पेटीएमच्या दोन कोटी ग्राहकांना यामुळे बँक बदलावी लागणार आहे. फास्टटॅगने 32 बँकांची यादी जहीर केली आहे. त्यातील कोणत्याही बँकेकडून तुम्हाला फास्टटॅग खरेदी करता येईल.

पेटीएमवर घातली बंदी

हे सुद्धा वाचा

RBI ने पेटीएमवर अनेक प्रकारचे प्रतिबंध लावले आहेत. 29 फेब्रुवारीनंतर पेमेंट बँकेमध्ये ग्राहकांना रक्कम जमा करता येणार नाही. 11 मार्चनंतर ग्राहक जोडण्याची प्रक्रिया बंद होईल ग्राहकांना सध्या बँकेतून रक्कम काढण्यास परवानगी आहे. पण बँकिंग सेवा अवघ्या महिना भरातच ठप्प होईल. बँकेवर सर्वात मोठा ठपका मनी लाँड्रिंगचा करण्यात येत आहे. तर केवायसी न करता अनेक बँक खाती सुरु करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यात 1,000 हून अधिक बँक खाती केवळ एकाच पॅन कार्ड आधारे उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.

ईडीने केली चौकशी

अंमलबजावणी संचालनालयाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या कारवाईनंतर बँकेच्या मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यांनी अनेक कागदपत्रं सुद्धा घेतली. गुरुवारी याविषयीची माहिती समोर आली. केंद्रीय एजन्सी परदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियम (FEMA) अंतर्गत फिनटेक कंपनीमध्ये अनियमिततेची चौकशी करण्यात येत आहे. मनी लाँडरिंग विरोधी अधिनियमातंर्गत (PMLA) पेटीएमची चौकशी आधीपासूनच सुरु आहे.

पेटीएमच्या शेअरमध्ये उसळी

आरबीआयच्या कारवाईनंतर गेल्या शुक्रवारी पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी पडझड दिसून आली होती. तर पेटीएमच्या शेअरमध्ये 36% घसरण झाली होती. या कंपनीचे बाजारातील मूल्य 2 अब्ज डॉलरने घसरले होते. या घसरणीनंतर आज, 16 फेब्रुवारी रोजी पेटीएमच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसले. आज पेटीएमचा शेअर 0.20 टक्क्यांनी वाढून 325.70 रुपयांवर व्यापार करत होता. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये 21 टक्क्यांची घसरण दिसून आली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.