मोठी बातमी! तुमच्या बँकेत जमा पैशांवर 5 लाखांचा विमा मिळणार, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवी विमा आणि पत हमी निगम (डीआयसीजीसी) कायद्यातील सुधारणांना मान्यता देण्यात आलीय.
नवी दिल्लीः मोदी सरकारनं (Modi Govt) बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवी विमा आणि पत हमी निगम (DICGC) कायद्यातील सुधारणांना मान्यता देण्यात आलीय. याद्वारे खातेधारकांना बँकेच्या विम्यातून 90 दिवसांच्या आत पैसे मिळू शकतील.
तर ग्राहकांना 90 दिवसांत बँक ठेवींवर पाच लाख रुपयांचा विमा
जर बँक बुडली तर ग्राहकांना 90 दिवसांत बँक ठेवींवर पाच लाख रुपयांचा विमा मिळेल, असंही सरकारनं स्पष्ट केलंय. बँका बंद झाल्यास किंवा पैसे काढण्यास ग्राहकांवर बंदी घातल्यास त्यांचे 5 लाख रुपये सुरक्षित ठेवण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार डीआयसीजीसी बिल सादर करेल. या हालचालीमुळे ठेवीदारांना प्रवेश निश्चित करून त्यांच्या आर्थिक गरजा निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल. बँका अपयशी ठरल्यास अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी DICGC कव्हरसाठी सहज आणि कालबद्ध मदत करेल, असंही आश्वासन दिलेय.
अर्थसंकल्पात केली होती घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती, जी आता सरकारने लागू केली आहे. ग्राहकांनी बँकेत जमा केलेले पैसे सुरक्षित राहावेत, असा सरकारचा या निर्णयामागील हेतू आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (PMC Bank) मध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर बँकेच्या ग्राहकांनी त्यांचे पैसे परत देण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्यांच्या पैशाचे संरक्षण करण्यासाठी अर्थसंकल्पात ही घोषणा केली. 2021 च्या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी डीआयसीजीसी कायद्यांतर्गत विमा उतरवलेल्या बँक ठेवींची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.
कोणाला फायदा होणार?
नियमांमध्ये म्हटले आहे की, जर एखादी बँक दिवाळखोरीत निघाल्यास त्या बँकेच्या ग्राहकांची पाच लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहील आणि ही रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) या संपूर्ण मालकीच्या कंपनीअंतर्गत सुरक्षित आहे. सर्व वाणिज्यिक आणि सहकारी बँकांचा डीआयसीजीसीद्वारे विमा उतरविला जातो, त्याअंतर्गत ठेवीदारांच्या बँक ठेवींवर विमा संरक्षण उपलब्ध आहे. बँकेत बचत, फिक्स्ड, करंट, रिकरिंग अशा सर्व प्रकारच्या ठेवींचा डीआयसीजीसीद्वारे विमा उतरविला जातो. सर्व छोट्या मोठ्या बँका, सहकारी बँका त्याच्या कार्यक्षेत्रात येतात. जर निश्चित रकमेव्यतिरिक्त एखाद्या ग्राहकाकडे बँकेत पाच लाखांहून अधिक रक्कम जमा असेल तर उर्वरित रक्कम बुडण्याची भीती असते.
संबंधित बातम्या
‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 12 महिन्यांत केले श्रीमंत, 1 लाखाचे झाले 5 लाख
सरकारकडून घर बसल्या 15 लाख रुपये जिंकण्याची संधी, फक्त हे काम करा
Big news! You will get insurance of Rs 5 lakh on the money deposited in your bank, an important decision of the Modi government