NPA : बँकांना मोठा दिलासा; एनपीए खात्यात मोठी घट, एनपीएची संख्या गेल्या सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर

मार्च 2022 पर्यंत बँकांमध्ये (Bank) बुडीत कर्ज म्हणजे एनपीए (NPA) एकूण 7.42 लाख कोटी इतकेच आहेत. ही कर्ज गेल्या सहा वर्षांतील निचांकी स्तरावरील आहेत.

NPA : बँकांना मोठा दिलासा; एनपीए खात्यात मोठी घट, एनपीएची संख्या गेल्या सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 2:53 PM

मार्च 2022 पर्यंत बँकांमध्ये (Bank) बुडीत कर्ज म्हणजे एनपीए (NPA) एकूण 7.42 लाख कोटी इतकेच आहेत. ही कर्ज गेल्या सहा वर्षांतील निचांकी स्तरावरील आहेत. 2018 मध्ये एनपीए सर्वात जास्त म्हणजे 10.36 लाख कोटी इतके होते. एनपीए म्हणजेच बुडीत कर्ज, ज्यांनी बँकेकडून कर्ज (loan) घेतले मात्र त्यानंतर हफ्तेच भरले नाहीत अशा सर्व कर्जाचा समावेश हा एनपीएमध्ये होतो. बँकांच्या एनपीएमध्ये झालेली ही घट आपल्याला पहिल्या नजरेत चांगली वाटू शकते. मात्र, ही स्थिती सुधारणांमुळे झाली नसून, खातेवहीतल्या एन्ट्रीचा तो चमत्कार आहे. ज्या कर्जाची वसुली होऊ शकत नाही अशी कर्जे बँकांनी बुडीत खात्यात टाकल्यानं एनपीएमध्ये वाढ झाली होती. वाढते एनपीए खाते हा बँकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला होता. आता यावर बँकांनी उपाय शोधून काढला आहे. एनपीए खात्यांची संख्या कमी करण्यासाठी आता बँका आपल्याला होणाऱ्या नफ्यातून एनपीए खात्याची भरपाई करत आहेत, त्यामुळे आपोआपच एनपीए खात्याच्या संख्येत घट झाली आहे.

ग्राहकांना फटका

थोडक्यात काय तर तुमच्या ठेवीतून बँकेला जो नफा झाला. या नफ्याचा वापर बँकेनं बुडीत कर्जाच्या तरतुदीसाठी केलाय. बुडीत कर्जासाठी नफ्यातील रकमेची तरतूद केली नसती तर तुम्हाला लाभांश मिळाला असता किंवा तुमच्या मुदत ठेवींवर चांगले व्याज मिळाले असते.आता बँकांनी किती कर्जे बुडीत खात्यांमध्ये टाकली आहेत? ते पाहूया. सरकारी आकडेवारीनुसार मार्च 2018 पासून मार्च 2022 पर्यंत सरकारने 8.53 लाख कोटी रुपयांची कर्जे बुडीत खात्यात टाकली आहेत. तसेच मार्चमध्ये संपलेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात बँकांनी 1.75 लाख कोटी रुपये बुडीत खात्यात टाकली आहेत. बँकांनी दिलेल्या एकूण कर्जामध्ये NPA केवळ 5.90 टक्के आहे. एनपीए मार्च 2018 मध्ये 11.2 टक्के होता. म्हणजेच एखाद्या बँकेनं 100 रुपयांचे कर्ज दिले असल्यास त्यातील 5 रुपये 90 पैसे NPA असतो. या अगोदर NPA 11 रुपयांपेक्षा जास्त होता.

हे सुद्धा वाचा

एनपीए वाढण्याची भीती

दरम्यान कोरोनामुळे बुडीत कर्जाच्या संख्येत वाढ झालीये आणि कोरोनाचा प्रभाव अद्याप कायम आहे. या आर्थिक वर्षात बुडीत कर्जाची आकडेवारी आणखी वाढू शकते. कोरोनाकाळात कर्जाचं पुनर्गठण दोन वर्षासाठी करण्यात आलंय.पुनर्गठणाचा कालावधी 2023 मध्ये संपणार आहे. त्यामुळे चालू वर्षी बुडीत कर्जाचा आकडा अजून वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.