Infosys : मोठी बातमी! IT क्षेत्रातील दादा कंपनी विलिनीकरणाच्या वाटेवर, इन्फोसिसच्या सीईओंच्या वक्तव्याने खळबळ

Infosys : आयटी सेक्टरमध्ये मोठी घडामोड घडण्याची शक्यता दिसत आहे. आयटी क्षेत्रातील दादा कंपनी विलिनीकरणाच्या वाटेवर असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचे परिणाम काय साधल्या जातील, पाहुयात..

Infosys : मोठी बातमी! IT क्षेत्रातील दादा कंपनी विलिनीकरणाच्या वाटेवर, इन्फोसिसच्या सीईओंच्या वक्तव्याने खळबळ
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 8:22 PM

नवी दिल्ली : इन्फोसिस ही भारताच्या आयटी सेक्टरमधील (IT Sector Infosys Company) दादा कंपनी आहे. शुन्यातून ही कंपनी उभी करण्यात आली आहे. कंपनीकडे अफाट संपत्ती, मोठं कुशल मनुष्यबळ आहे. कंपनीचे तिमाही निकाली हाती आलेत, त्यात कंपनी फायद्यात आहे. कंपनीचा जागतिक व्यवसाय जोरात आहे, असे असताना कंपनी विलिनीकरणाच्या बाता मारत असेल तर त्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अनेक गुंतवणूकदारांना ही हाच प्रश्न सतावत आहे. पण इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख (CEO Salil Parekh) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मात्र या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. हा नेमका प्रकार तरी काय आहे?

काय केले वक्तव्य इन्फोसिस कंपनीचे सीईओ सलिल पारेख यांनी वक्तव्य केले आहे. त्यांचे हे सूचक वक्तव्य लगेचच व्हायरल झाले आहे. सध्या एखाद्या कंपनीचा ताबा घेण्यासाठी, संपादन करण्यासाठी अथवा विलिनीकरणासाठी सर्वात पोषक वातावरण असल्याचा दावा त्यांनी केला. इन्फोसिस अधिग्रहण प्रस्तावांबाबत नेहमीच तयार असते, असे सूचक वक्तव्य करुन त्यांनी एकच खळबळ उडवून दिली. सध्या विलिनीकरणासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचा दावा त्यांनी केला.

तर विचार करता येईल इन्फोसिसने मार्च तिमाही निकाल जाहीर केले. त्यात अपेक्षेप्रमाणे घडामोडी घडल्या नसल्या तरी कंपनी फायद्यात आहे. कंपनी गुंतवणूकदारांसाठी घसघशीत लाभांश पण जाहीर केला आहे. या निकालाची घोषणा करतानाच, सीईओंनी आमची चांगली घौडदौड सुरु आहे. आकडेवारी दमदार आहे. जर एखादी कंपनी तयार असेल आणि तिच्याशी वेव्हलाईन जुळत असेल तर आम्ही पुढील विचार करु, असे सीईओंनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

अपेक्षांवर खरी उतरली नाही कंपनी फायद्यात आहे. पण अपेक्षांवर कंपनी खरी उतरली नाही. कंपनीचा वृद्धीदर घसरला. तर कंपनीने पुढील आर्थिक वर्ष, 2023-24 साठी केवळ चार ते सात टक्के महसुली वाढ होण्याचा अंदाज वर्तवला. अमेरिकन बँकिंग सेक्टरच्या घडामोडींमुळे हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इन्फोसिस ही दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. मार्च तिमाहीत कंपनीने वार्षिक आधारावर 7.8 टक्के वृद्धीसह 6,128 कोटींचा शुद्ध लाभ पदरात पाडून घेतला आहे. पण गेल्या वर्षी ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीपेक्षा ही कामगिरी फिक्की आहे.

तगडा लाभांश कंपनी बोर्डने आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति शेअर 17.50 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी कंपनीने शुद्ध लाभ 9 टक्के वाढून 24,095 कोटी रुपये कमाविला. तर कंपनीचा महसूल 20.7 टक्के वाढून 1,46,767 कोटी रुपये राहिला. इन्फोसिसने मार्च तिमाहीत एकूण 3,43,234 कर्मचारी होते. गेल्या तिमाहीपेक्षा 3,611 कर्मचारी कमी झाले आहेत.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.