आयुष्यमान भारत योजनेविषयी मोठी अपडेट; आता कुटुंबातील इतक्या लोकांना मिळणार आरोग्य सुविधा, सरकारने केला मोठा बदल

Ayushman Bharat Yojana Ayushman Card : जनतेला मोफत आरोग्य सेवा सुविधा मिळण्यासाठी मोदी सरकारने 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू केली होती. आतापर्यंत योजनेतंर्गत 34 कोटींहून अधिक आयुष्यमान कार्ड तयार करण्यात आले आहे. सरकारने बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत योजनेत मोठा बदल केला आहे.

आयुष्यमान भारत योजनेविषयी मोठी अपडेट; आता कुटुंबातील इतक्या लोकांना मिळणार आरोग्य सुविधा, सरकारने केला मोठा बदल
आयुष्यमान भारत योजना
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 9:18 AM

आयुष्यमान भारत योजना जनतेला मोफत आरोग्य सेवा-सुविधा देणारी योजना आहे. मोदी सरकारने 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू केली होती. या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा मिळतात. सरकार प्रत्येक नागरिकामागे इतका खर्च करते. आतापर्यंत योजनेतंर्गत 34 कोटींहून अधिक आयुष्यमान कार्ड तयार करण्यात आले आहे. सरकारने बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत योजनेत मोठा बदल केला आहे. कॅबिनेट बैठकीत 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान योजनेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

34 कोटींहून अधिक आयुष्यमान कार्ड

सरकारी आकडेवारीनुसार, आयुष्यमान भारत योजनेतंर्गत आयुष्यमान कार्डच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 30 जून 2024 रोजीपर्यंत हा आकडा 34.7 कोटींहून अधिक झाला आहे. या कालावधीपर्यंत एक लाख कोटी रुपयापर्यंतच्या 7.37 कोटी रुग्णांच्या खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. या योजनेतंर्गत देशभरातली 29 हजारांहून अधिक सूचीबद्ध रुग्णालयात कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

देशातील 6 कोटी ज्येष्ठांसाठी मोठा निर्णय

आयुष्यमान भारत योजनेविषयी केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. देशातील 4.5 कोटी कुटुंबातील 6 कोटी ज्येष्ठांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवा मोफत देण्यात येतील. सध्या ज्येष्ठ नागरीक या योजने व्यतिरिक्त सरकारच्या इतर आरोग्य सेवेचा फायदा घेत असेल तर त्यांचा या योजनेत आपोआप समावेश होईल.

एका कुटुंबात किती जणांना कार्ड?

सरकारने 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजना आणली. नागरिकांना मोफत आरोग्य सेवा आणि सुविधा मिळण्यासाठी ही योजना आणली आहे. कुटुंबातील किती जणांसाठी आयुष्यमान कार्ड तयार केले जाऊ शकते? किती जणांना योजनेचा फायदा होतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर याविषयीची कोणतीही मर्यादा सरकारने घालून दिलेली नाही. कुटुंबातील कितीही सदस्यांना आयुष्यमान कार्ड तयार करता येते.

असे तयार करा आयुष्यमान कार्ड

तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर टोल फ्री क्रमांक 14555 वर कॉल करू शकता. त्यावरून तुम्हाला योजनेसंबंधी आणि पात्रतेसंबंधीची माहिती मिळेल. अथवा तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन कागदपत्रांसह अर्ज करू शकता. अर्ज करताना आधार कार्ड, निवासी पुरावा, राशन कार्ड याशिवाय एक नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.