Gautam Adani : अदानी समूहावर पुन्हा संकटाचे ढग, 10 कंपन्यांचे शेअर गडगडले, 52,000 कोटींचा फटका
Gautam Adani : अदानी समूहाला हिंडनबर्ग रिपोर्टनंतर पुन्हा एक झटका बसला आहे. एका उत्तराने या ग्रूपला जोरदार फटका बसला. 10 कंपन्यांचे शेअर गडगडले, 52,000 कोटींचे एकाच दिवसात नुकसान झाले.
नवी दिल्ली : अदानी समूहाचे शेअर्स (Adani Group Share) शुक्रवारी धडाधड पडले. त्यांनी सपाटून मार खाल्ला. या समूहाच्या शेअर बाजारातील सूचीबद्ध 10 कंपन्यांचे शेअर्स गडगडले. सकाळी हे शेअर्स बाजार उघडताच घसरणीवर होते. संध्याकाळी बाजार बंद होताना गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले. या समूहातील विविध कंपन्यांचे मिळून एकूण 52,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अमेरिकन बाजार नियामकाने हिंडनबर्ग रिपोर्टच्या (Hindenburg Report) आधारे या समूहाला काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर सकाळपासूनच या समूहाच्या विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये पडझड सुरु झाली.
आज सर्वाधिक पडझड बाजारात आज सर्वाधिक पडझड अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये दिसून आली. यानंतर अदानी पॉवर आणि अदानी पोर्ट्स यांचा क्रमांक लागला. शुक्रवारी सेन्सेक्स पण 259.52 अंकांच्या घसरणीसह 62,979.37 अंकावर बंद झाला. निफ्टीत आज 105.75 अंकांची घसरण झाली. तर बाजार 18,665.50 अंकावर बंद झाला.
अमेरिकेने बाजाराचे प्रश्न हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनुसार, अमेरिका रेग्युलेटरने अदानी समूहाला, अमेरिकन गुंतवणूकदारांच्या हितसंबंधात काही प्रश्न विचारले. यासंबंधीची वार्ता शेअर बाजारात येऊन धडकताच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण आली. बाजारात या कंपनीचे शेअर्स गडगडले. अमेरिकन बाजार नियामकने अदानी समूहावरील कर्जाचा डोंगर पाहून चिंता व्यक्त केली. तसेच शेअर्सच्या किंमतीशी छेडछाड केल्याच्या आरोपावर या समूहाकडून खुलासा मागितला. नियामकने अदानी समूहाला अमेरिकन गुंतवणूकदारांसमोर इत्यंभूत माहिती देण्याचे बंधन घातले आहे.
अदानी समूहाच्या शेअरमध्ये आपटी बार अदानी समूहाची फ्लॅगशीप कंपनी अदानी इंटरप्राईजेस एनसएसईवर शुक्रवारी 2,229 रुपयांपर्यंत घसरला. अदानी पॉवर शेअर 242 रुपयांवर बंद झाला. तर अदानी पोर्टचा शेअर 703 आणि अदानी ट्रान्समिशनचा शेअर 759.75 रुपयांवर बंद झाला.
इतर शेअरची अवस्था काय अदानी समूहातील इतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. अदानी टोटल गॅसचा शेअर 636 रुपये, एनडीटीव्हीचा शेअर 214.55 रुपये, अदानी ग्रीनचा शेअर 954.90 रुपये, अदानी विल्मर का शेयर 404.80 रुपये, अंबुजा सिमेंटचा शेअर 425 रुपये आणि एसीसी लिमिटेडचा शेअर 1774.95 रुपयांवर बंद झाला.
समूहाने फेडले कर्ज या समूहाने 12 मार्चपर्यंत 2.15 अब्ज डॉलरचे कर्ज फेडल्याचे यापूर्वीच जाहीरे केले होते. वेळेच्या आतच कर्जाची फेड करण्यात आली. प्रमोटर्सने अंबुजा सिमेंट कंपनी खरेदीसाठी 70 कोटींचे घेतलेले कर्ज प्रमोटर्सने चुकते केले. त्यासाठी 20.3 कोटींचे व्याज मोजण्यात आले. अदानी ग्रुपच्या पोर्टफोलिओतील कर्जाचा बोझा कमी झाला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये ते 3.81पट होते. या आर्थिक वर्षात 3.27 पट उरले आहे.