Gautam Adani: 2 वर्षात 300 टक्क्यांनी संपत्तीत वाढ! जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनण्यासाठी गौतम अदानी सज्ज

अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांचे श्रीमंताच्या यादीतील स्थान डळमळीत करु शकतात. अदानी पोर्टसच्या शेअर्सने गेल्या दोन वर्षांत 300 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

Gautam Adani: 2 वर्षात 300 टक्क्यांनी संपत्तीत वाढ! जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनण्यासाठी गौतम अदानी सज्ज
संपत्ती वाढीच्या क्रमवारीत गौतम अदानींचा कितवा नंबर?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 9:58 AM

अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी (Gautam Adani) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांचे श्रीमंतांच्या यादीतील स्थान डळमळीत करु शकतात. अदानी पोर्टसच्या शेअर्सने गेल्या दोन वर्षांत 300 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या निर्देशकांने (Bloomberg billionaires Index) याविषयीचे संकेत दिले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यावर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांतच गौतम अदानी यांनी 21 अरब डॉलर हून अधिकची कमाई केली आहे. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांना 1.1 अरब डॉलरची माया जमविता आली आहे. भारतातील अनेक बंदरांचा विकास आणि आवकजावक अदानी पोर्ट्सच्या अखत्यारीत आहे. एवढेच नाही तर विशेष आर्थिक क्षेत्रात ही कंपनीचा मोठा हिस्सा आहे. कंपनी एकूण 13 बंदराचे काम पाहते. त्यात मुंद्रा, दाहेज, हजीरा, धामरा, इन्नोर, कट्टुपल्ली या बंदरांचा समावेश आहे, याशिवाय कंपनीकडे विशाखापट्टनम, कांडला आणि मोरमुगाव येथील टर्मिनल आहेत.

अदानी पोर्ट्स कंपनी, कोळसा, क्रुड कंटेनर्स, रासायनिक खते, कृषी उत्पादने, स्टील आणि प्रोजेक्ट कार्गो, खाद्यतेल, रसायने आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहे. 56 कोटी टन क्षमता असलेल्या या कंपनीच्या एकूण आयात-निर्यातीत 28.6 टक्के मुल्याधारीत हिस्सा असून कंटेनर बाजारात 42.6 टक्के हिस्सा आहे. यासोबतच कंपनीने हरियाणा राज्यातील पाटली, पंजाबमध्ये किला रायपूर आणि राजस्थानातील किशनगढ या तीन ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क सुरु केला आहे.

2007 मध्ये आणला आयपीओ

व्यापारामध्ये अनेक उलाढाली केल्यानंतर कंपनीने 2007 मध्ये शेअर बाजारात आयपीओ आणला. त्याची किंमत 440 रुपये होती. या शेअरवर गुंतवणुकादारांनी उड्या टाकल्या होत्या. सुचीबद्ध झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हा आयपीओ 1,150 रुपयांवर पोहचला होता. त्यानंतर तो 961.70 रुपयांवर बंद झाला .

अदानी शेअरची कामगिरी

  1. 52 हप्त्यातील उच्चांक 901 रुपये
  2. 8 एप्रिल 2022 रोजीचा भाव 840 रुपये
  3. शेअरमधील घट 6.8 टक्के

शेअरकडून मिळालेला परतावा

मार्च 2020 मध्ये या स्टॉकने 313 टक्के परतावा दिला आहे

  1. 1 महिना-15 टक्के
  2. 1 वर्ष-12.8 टक्के
  3. 5 वर्ष-157.7 टक्के
  4. 23 मार्च 2020 पासून 313.8 टक्के (203 रुपयांच्या निच्चांकी स्तरावर)
  5. आयपीओ तील परतावा आतापर्यंत- 352.1 टक्के

याच क्षेत्रातील इतर कंपन्यांशी तुलना करता अदानी पोर्टची कामगिरी अत्यंत दमदार आहे. इक्विटीवर परताव्यासह कॅश आणि ऑपरेटिंग मार्जिनपर्यंत इतर कंपन्यांपेक्षा या स्टॉकने मजबूत कामगिरी बजावली आहे. फक्त या कंपनीबाबत एकच नकारात्मक बाब समोर येत आहे, ती म्हणजे 34,941 कोटी रुपयांचे भले मोठे कर्ज ही होय.

इतर बातम्या :

Volvo Car: आलिशान वोल्वो कारची किंमत तब्बल तीन लाखांनी वाढली! आता नेमकी किंमत किती? जाणून घ्या

Today Petrol Diesel rate: कच्च्या तेलाचे दर वाढले, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे दर

अंबानींचं रिटर्न गिफ्ट! 65वा वाढदिवस 63 हजार कोटींचा नफा, रिलायन्स शेअर्स टॉपला

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.