Bonus Share | गुंतवणूकदारांचा धिंगाणा! 6 महिन्यात जोरदार परतावा, आता बोनस शेअरचा धमाका

Bonus Share | शेअर बाजारात सूचीबद्ध ही कंपनी गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून देईल. गेल्या सहा महिन्यात या कंपनीने जोरदार परतावा दिला आहे. आता कंपनी बोनस शेअर देण्याची शक्यता आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक तोंडावर आली आहे. त्यात याविषयीचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकाश ठेंगणे झाले आहे.

Bonus Share | गुंतवणूकदारांचा धिंगाणा! 6 महिन्यात जोरदार परतावा, आता बोनस शेअरचा धमाका
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 10:29 AM

नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारातील काही कंपन्या एकदम फार्मात आहेत. त्यांचा महसूल वाढला आहे. नवीन ऑर्डर मिळाल्याने संचालक मंडळ पण जाम खूश आहे. या कंपनीला 1,01,79,437 इतक्या रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. त्यात एक ऑर्डर तर स्विगीच्या उपकंपनीने दिली आहे. इतर ही अनेक कंपन्यांनी ऑर्डर दिली आहे. त्यामुळे या कंपनीची व्यवसायीक घौडदौड जोमात सुरु आहे. त्याचा गुंतवणूकदारांना पण फायदा होत आहे. गेल्या सहा महिन्यात या कंपनीने 240 टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीवर तज्ज्ञांचे लक्ष आहे. आता कंपनी लवकरच बोनस शेअर देण्याची घोषणा करणार आहे.

कधी होणार घोषणा

Alphalogic Industries Ltd ही कंपनी गुंतवणूकदारांना लवकरच बोनस शेअर देणार आहे. सेबीला या घडामोडींची कल्पना देण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळ 18 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये उर्वरीत देयकांच्या लेखापरीक्षणाला मंजूरी देण्यात येईल. बोनस शेअर किती द्यायचा याचा निर्णय घेण्यात येईल. इतर काही निर्णय घेण्यात येतील.

हे सुद्धा वाचा

ऑर्डरचा पडला पाऊस

कंपनीची कामगिरी जोरदार आहे. कंपनीला अनेक ऑर्डर मिळाल्या आहेत. विविध ठिकाणाहून या कंपनीला एक कोटींहून अधिकची ऑर्डर मिळाली आहे. त्यात 71,10,257 लाखांची ऑर्डर ही स्विगीची उपकंपनी स्कूटसी लॉजिस्टिकने दिली आहे. ट्रिनिटी इंजिनिअर्स कंपनीने 30,69,180 रुपयांची ऑर्ड दिली आहे. यासह इतर ही काही कंपन्यांनी अल्फालॉजिक इंडस्ट्रीजला ऑर्डर दिली आहे. त्यामुळे संचालक मंडळ सध्या खूश आहे. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे.

शेअर पण तेजीत

या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला. शुक्रवारी कंपनीचा शेअर 5 टक्क्यांनी वधारला, हा शेअर 327.75 रुपयांवर पोहचला. या स्टॉकने गेल्या 52 आठवड्यातील ही उच्चांकी झेप घेतली आहे. या शेअरने गेल्या काही दिवसांपासून अप्पर सर्किट सुरु केले आहे. या कंपनीत सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. सहा महिन्यात या कंपनीने 240 टक्क्यांची झेप घेतली आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.