GST Refund : घराचा सौदा फिस्कटला? मग फायदा करुन घ्या, असा मिळवा जीएसटी रिफंड

GST Refund : जीएसटी नियमात बदलामुळे तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. जर ग्राहकाने एखादा अतिरिक्त कर चुकता केला असेल तर तो स्वतः जीएसटी पोर्टलवर जाऊन तो करावर दावा करु शकतो, ती रक्कम परत मिळवू शकतो.

GST Refund : घराचा सौदा फिस्कटला? मग फायदा करुन घ्या, असा मिळवा जीएसटी रिफंड
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 9:09 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही एखाद्या बिल्डरकडून घर खरेदी करण्यासाठी बुकिंग (Home Booking) केले. पण काही कारणांमुळे हा सौदा फिस्कटला. तुम्ही बुकिंग रद्द केले. तर अशावेळी तुम्ही घर बुकिंग करताना जीएसटी भरला असेल तर त्यावर तुम्हाला दावा सांगता येतो. विशेष म्हणजे ग्राहकाला (Consumer) स्वतः जीएसटी पोर्टलवर जाऊन संबंधित माहिती भरुन अतिरिक्त करावर दावा सांगता येतो. त्याला करापोटी भरलेली रक्कम परत मिळवता येते. तसेच विमा पॉलिसी (Insurance Policy) रद्द केल्यास तुम्ही त्यावर जो जीएसटी भरला आहे. त्यावर हक्क सांगता येतो. जीएसटी रिफंड (GST Refund) मिळवता येतो. गेल्या आर्थिक वर्षापासून ग्राहकांना ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे. त्यासाठी ग्राहकानं बिल्डर अथवा विमा कंपनीवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जीएसटी नियमांत बदल करण्यात आला. या नवीन नियमांमुळे जीएसटी रिफंड मिळवणे सोप झालं आहे. जर ग्राहकाने काही अतिरिक्त आणि गरज नसताना कर जमा केला असेल तर त्याला त्यावर हक्क सांगता येईल. जीएसटी पोर्टलवर ग्राहकाला स्वतः जाऊन रक्कम परत मागता येते. घर खरेदी करताना, पहिली जी रक्कम देण्यात येते. त्यात बिल्डर जीएसटीचीही रक्कम वसूल करतो. बांधकाम क्षेत्रासाठी 5 टक्के जीएसटी आहे.

घर बुकिंग केल्यानंतर पुढील 11 महिन्यात ग्राहक केव्हाही घराचं बुकींग रद्द करु शकतो. त्यावेळी बिल्डर त्याने बुकिंगसाठी दिलेली रक्कम परत करतो. पण जीएसटीसाठी घेण्यात आलेली रक्कम तो परत करत नाही. कारण ही रक्कम सरकारकडे जमा झालेली असते. पण नवीन नियमानुसार, घराचं बुकिंग रद्द झाल्यानंतर ग्राहकाला दोन वर्षांदत कधीही जीएसटी रिफंड घेता येते. त्यासाठी तुमच्याकडे जीएसटी क्रमांक नसला तरी हरकत नाही. तुम्ही जीएससटी पोर्टलवर तात्पुरती नोंदणी करुन रिफंडसाठी अर्ज दाखल करु शकता. ही प्रक्रिया ग्राहकाला घरबसल्या ही करता येते.

हे सुद्धा वाचा

नवीन नियमांमध्ये काय आहे सुविधा

  1. आता तात्पुरती नोंदणी करुन जीएसटी रिफंड मिळविता येतो.
  2. विमा पॉलिसी खरेदीनंतर ती रद्द केल्यास त्यावर जीएसटी रिफंड घेता येतो.
  3. इतर अनेक सेवांमध्ये रिफंड मिळते. फक्त तुम्ही त्या सेवेचे फायदा घ्यायला नको.
  4. जुन्या नियमांनुसार गेल्या आर्थिक वर्षात जीएसटी रिफंड मिळत नव्हता.
  5. गेल्यावर्षी डिसेंबर 2022 मध्ये केंद्र सरकारने नियमांत बदल केला होता.
  6. gst.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ग्राहकाला तात्पुरती नोंदणी करता येते.
  7. त्यासाठी या पोर्टलवर सेवा या पर्यायावर क्लिक करा.
  8. त्यानंतर युझर सर्व्हिस हा पर्याय दिसले. त्यावर क्लिक करा.
  9. जनरेट युझर्स आईडी फॉर अनरजिस्टर्ड एप्लीकेंट यावर क्लिक करा.
  10. याविषयीचा तपशील जमा करा आणि त्याचा पडताळा करा.
  11. त्यानंतर ग्राहकाने त्याचा पॅनकार्ड क्रमांक जमा करावा.
  12. ज्या राज्यात रिफंड हवा, त्याचे नाव टाकावे लागेल.
  13. ग्राहकाचा पत्ता, बँक खाते, आधार कार्ड याचा तपशील जमा करा.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.